विद्यार्थी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी मेघराज घाडगे, उपाध्यक्षपदी ओम अंदुरकरांची निवड!
ॲड.विराज जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक युवकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश...
विद्यार्थी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी मेघराज घाडगे, उपाध्यक्षपदी ओम अंदुरकरांची निवड!
ॲड.विराज जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक युवकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश…
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
विद्यार्थी काँग्रेसच्या तुळजापूर शहराध्यक्षपदी मेघराज घाडगे तर उपाध्यक्षपदी ओम अंदुरकर यांची निवड करण्यात आली आहे. या निमित्ताने तुळजापूर शहरातील अनेक उत्साही युवकांनी विद्यार्थी काँग्रेसमध्ये प्रवेश करून संघटनेला नवे बळ दिले आहे.

ही नियुक्ती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील,अमोल कुतवळ, रणजीत इंगळे,आनंद जगताप आदींच्या उपस्थितीत करण्यात आली.यावेळी नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन पक्षात स्वागत करण्यात आले.ॲड.विराज जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ओम घाडगे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शहरातील युवकांनी विद्यार्थी काँग्रेसचा झेंडा हातात घेतला.

‘विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर प्राधान्याने काम करणार’ — मेघराज घाडगे
निवडीनंतर आपल्या प्रतिक्रिया देताना मेघराज घाडगे म्हणाले, “तुळजापूर शहरातील विद्यार्थ्यांच्या आणि युवकांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती मिळवून देणे, शासनाच्या धोरणांबाबत त्यांना अवगत करणे आणि शिक्षक-विद्यार्थी यांच्यात समन्वय साधून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवणे हे आमचे ध्येय आहे.” ते पुढे म्हणाले की, विद्यार्थी काँग्रेस हे केवळ राजकीय नव्हे तर सामाजिक भान असलेले व्यासपीठ आहे. येत्या काळात शहरातील प्रत्येक महाविद्यालयात विद्यार्थी हितासाठी विविध उपक्रम राबवले जातील.

तुळजापूर विद्यार्थी काँग्रेसच्या नव्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करताना जिल्हाध्यक्ष धीरज पाटील,अमोल कुतवळ,रणजीत इंगळे,आनंद जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.



