ब्रेकिंगमहाराष्ट्र
२५ वर्षांच्या संघर्षाला गौरवाची पावती; तुळजाभवानी रेल्वे संघर्ष समितीच्या योद्ध्यांना महात्मा फुले महाराष्ट्र रत्न पुरस्कार
२५ वर्षांच्या संघर्षाला गौरवाची पावती; तुळजाभवानी रेल्वे संघर्ष समितीच्या योद्ध्यांना महात्मा फुले महाराष्ट्र रत्न पुरस्कार

0
6
7
8
4
1
तुळजापूर :सोलापूर–तुळजापूर–धाराशिव या बहुप्रतिक्षित रेल्वेमार्गासाठी गेली तब्बल पंचवीस वर्षे सातत्याने संघर्ष करणाऱ्या तुळजाभवानी रेल्वे संघर्ष समितीच्या संघर्ष योद्ध्यांना महात्मा फुले महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था, महाराष्ट्र राज्य (अहिल्यानगर) यांच्या वतीने हा भव्य गौरव सोहळा दिनांक १५ फेब्रुवारी २०२६ रोजी अहिल्या नगर येथील हॉटेल गोल्ड रोज येथे संपन्न झाला.या कार्यक्रमात सायली फाउंडेशन (आळंदी, पुणे) यांच्या संस्थापक अध्यक्षा कु. सायली धनाबाई, प्रमुख पाहुणे समाजसेवक व प्रसिद्ध ज्योतिष दीपक रत्नाकर दीक्षित तसेच अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्थेचे अध्यक्ष तुषार अर्जुन बोरुडे यांच्या शुभहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी समितीचे अध्यक्ष बबनराव गावडे, विकासराव तांबे, सतीश पवार, रत्नाकर खोले, अशोकराव साळुंखे, अंबादासराव पोपळे, मोहन भोसले, कोंडीबा प्रताप, अनिल हंगरगेकर, खय्युम शेख, राहुल मलकुनाईक, गवळी गोविंद दिवटे, तानाजी पाटील, अनमोल साळुंखे, दयानंद पांचाळ आदी संघर्ष योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला.याच कार्यक्रमात महाराष्ट्रभरातील विविध क्षेत्रांत कार्यरत सामाजिक संस्था व समाजसेवकांनाही महात्मा फुले महाराष्ट्र गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. विशेष म्हणजे, सहभागींच्या नावांच्या चिठ्ठीतून तुळजाभवानी रेल्वे संघर्ष समितीचे सदस्य सतीश पवार यांच्या नावाची निवड झाली. त्या निमित्ताने समितीच्या वतीने अनाथ व निराधार, अपंग व गरीब मुलांसाठी अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था, अहिल्यानगर यांना रू ११,००० रुपयांची रोख देणगी देण्यात आली.हा पुरस्कार म्हणजे तुळजापूरसह संपूर्ण परिसरातील रेल्वे मार्गासाठी झटणाऱ्या संघर्षाला मिळालेली सन्मानाची पावती असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.


0
6
7
8
4
1



