Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक महादेव खराटे यांचा भोगजीत गुणगौरव सोहळा..

राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक महादेव खराटे यांचा भोगजीत गुणगौरव सोहळा..

0 7 6 4 8 6

राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक महादेव खराटे यांचा भोगजीत गुणगौरव सोहळा..

कळंब : भिकाजी जाधव

“देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे… घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत…”
विंदा करंदीकरांच्या या ओळी आज जणू प्रत्यक्ष साकार झाल्या, कारण दातृत्व,कर्तृत्व आणि संस्कारांचा मिलाफ ठरलेल्या शिक्षक महादेव खराटे यांच्या सन्मान सोहळ्याने भोगजी गाव दुमदुमले.

महाराष्ट्र पोलीस मित्र असोसिएशन, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जाहीर झालेल्या राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड झालेल्या भोगजी ग्रामस्थांचे सुपुत्र व सध्या आढाळा प्राथमिक शाळेतील शिक्षक महादेव खराटे यांचा गुणगौरव सोहळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोगजी येथे थाटात पार पडला.

या वेळी खराटे सरांचा मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास शिक्षण विस्तार अधिकारी सुशील फुलारी, सरपंच बालाजी आडसुळ, मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड, सेवानिवृत्त तुरुंग अधिकारी बाबुराव खराटे, उपसरपंच बाबुराव खराटे, स्वप्नपूर्ती कन्स्ट्रक्शनचे अध्यक्ष रामेश्वर जाधवर, पत्रकार शरद आडसूळ, उद्योजक सुनील खराटे, इंजि. उमेश खराटे, बबलू मुंडे, उत्कर्ष आडसूळ, डॉ. गोरख मुंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

सत्काराच्या प्रसंगी शिक्षक महादेव खराटे यांनी आपल्या गावातील भोगजी शाळेसाठी अकरा हजार रुपये रोख निधी शालेय रंगरंगोटीकरिता तसेच ग्रंथालयासाठी ५१ पुस्तके भेट दिली. त्यांच्या या दातृत्वपूर्ण कृतीने उपस्थितांचे मन जिंकले.

यावेळी मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड यांच्या आवाहनास प्रतिसाद देत सरपंच बालाजी आडसुळ यांनी शाळेस बारा खुर्च्या देण्याचे अभिवचन दिले.

सत्कारास उत्तर देताना आदर्श शिक्षक आणि शिवव्याख्याते महादेव खराटे यांनी विविध थोर महापुरुषांच्या प्रेरणादायी प्रसंगांवर आधारित मार्गदर्शन करून उपस्थित मुलांना प्रबोधन केले. तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यही वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे आयोजन व यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक डॉ. शिवाजी चव्हाण, सहशिक्षक कालिदास वनवे, परमेश्वर बोबडे, अनंत डोंगरे, मनोहर सांगळे, बिभीषण मुंडे, दत्तात्रय जाधवर यांनी परिश्रम घेतले.

भोगजी शाळेच्या वतीने व ग्रामस्थांकडून महादेव खराटे सरांना मनःपूर्वक अभिनंदन व पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे