Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

तुळजापुरात रिक्षाची तोडफोड; अज्ञातांचा हैदोस, चालकाच्या उदरनिर्वाहावर घाला

हडको परिसरातील घटना; सीसीटीव्ही असतानाही गुन्हेगार मोकाट

0 7 6 4 9 7

तुळजापुरात रिक्षाची तोडफोड; अज्ञातांचा हैदोस, चालकाच्या उदरनिर्वाहावर घाला

हडको परिसरातील घटना; सीसीटीव्ही असतानाही गुन्हेगार मोकाट

तुळजापूर : शहरातील हडको परिसरात अज्ञात व्यक्तीकडून रिक्षाची तोडफोड केल्याची धक्कादायक घटना घडली असून, या प्रकारामुळे कष्टाने उदरनिर्वाह करणाऱ्या रिक्षाचालकावर आर्थिक संकट ओढवले आहे.मिळालेल्या माहितीनुसार,फिर्यादी अविनाश शाहाजी कदम (वय ४३, रा. आनंदनगर, हडको) हे रिक्षाचालक असून, त्यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दिली आहे. दिनांक ३ एप्रिल २०२६ रोजी रात्री सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास त्यांनी आपली ऑटो रिक्षा (क्र. एम एच-२५ बी ५५०७) बुध्दविहार समोर उभी केली होती. यावेळी अज्ञात व्यक्तीने रिक्षाच्या समोरील काच फोडून नुकसान केले.या घटनेमुळे गरीब कुटुंबातील कदम यांना मोठा आर्थिक फटका बसला असून, कष्टाने उभी केलेली उपजीविकेची साधनाच उद्ध्वस्त झाल्याने त्यांच्या कुटुंबासमोर संकट उभे ठाकले आहे. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध एनसी दाखल केली असून पुढील तपास पोहेकॉ. गायकवाड यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

▪️सीसीटीव्ही असूनही गुन्हेगार मोकाट

तुळजापूर शहरात नुकतेच एआय आधारित सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी कोट्यवधींचा खर्च करून उभारण्यात आलेल्या या यंत्रणेचा प्रभावी वापर करण्याची गरज व्यक्त होत आहे.स्थानिक नागरिकांनी मागणी केली आहे की, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा तातडीने शोध घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करावी तसेच नुकसानग्रस्त चालकाला भरपाई मिळवून द्यावी.

▪️“चोर सापडत नसेल तर कोट्यवधीं रुपये ए.आय सीसीटीव्हीचा उपयोग तरी काय?”शहरात चोरी,अवैध धंदे आणि गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी एआय सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असले तरी अशा घटनांमुळे त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

5/5 - (2 votes)

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 9 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे