ब्रेकिंगमहाराष्ट्र
सुमारे 1 कोटी 19 लाख रुपयांच्या पवनचक्कीच्या साहित्याची चोरी व नुकसान केल्याप्रकरणी आरोपींना जामीन मंजूर.
सुमारे 1 कोटी 19 लाख रुपयांच्या पवनचक्कीच्या साहित्याची चोरी व नुकसान केल्याप्रकरणी आरोपींना जामीन मंजूर.

0
7
6
4
8
6
सुमारे 1 कोटी 19 लाख रुपयांच्या पवनचक्कीच्या साहित्याची चोरी व नुकसान केल्याप्रकरणी आरोपींना जामीन मंजूर.
तुळजापूर: धाराशिव जिल्ह्यात विविध ठिकाणी पवनचक्कीतील तांब्याच्या तारा आणि साहित्यांवर डल्ला मारल्या प्रकरणी नळदुर्ग पोलिसांनी 4 आरोपींना दिनांक 23 एप्रिल २०२६ रोजी नळदुर्ग पोलिसांनी अटक केली होती.नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिकुंद्रा व गंधोरा शिवारात पवनचक्कीवर कर्तव्यावर असलेल्या सुरक्षारक्षकांना चकवा देऊन टान्सफॉर्मरमधील तांब्याच्या तारा आणि इतर साहित्याची सुमारे 1 कोटी 19 लाख 80 हजार रुपयांची चोरी व नुकसान करण्यात आले होते. याप्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात गु.र.नं.11/2026,गु.र.नं.328/2025 व गु.र.नं.449/2025 कलम 303 (2),324(5) भा. न्या.सं अन्वये आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात ॲड. विराज विलासराव जगदाळे यांनी आरोपींच्या वतीने प्रभावी युक्तिवाद करत मक्कम बाजू मांडली. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने बचाव पक्षाचा मुद्दा ग्राह्य धरत आरोपींना जामीन मंजूर केला आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील या बहुचर्चित प्रकरणाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणात जेष्ठ विधीज्ञ संजय पवार साहेब यांचे मार्गदर्शन लाभले.
0
7
6
4
8
6