Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

पोलीस विभागात खळबळ; येरमाळा ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्याचे निलंबन

जिल्हा पोलीस अधीक्षकांचा दणका; निष्काळजीपणाला शून्य सहनशीलतेचा इशारा

0 7 6 4 8 6

येरमाळा पोलीस ठाण्यातील प्रभारी अधिकाऱ्यावर कारवाई; कर्तव्यातील हलगर्जीपणामुळे एपीआय टी.आर.भालेराव निलंबित

जिल्हा पोलीस अधीक्षकांचा दणका; निष्काळजीपणाला शून्य सहनशीलतेचा इशारा

धाराशिव : पोलीस दलातील शिस्त, जबाबदारी आणि कर्तव्यनिष्ठेला सर्वोच्च प्राधान्य देत जिल्हा पोलीस प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. येरमाळा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून कार्यरत असताना विविध प्रकरणांमध्ये कर्तव्यात गंभीर निष्काळजीपणा केल्याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक टी.आर.भालेराव यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे.मा.जिल्हापोलीस अधीक्षक धाराशिव यांनी दिलेल्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. भालेराव यांनी येरमाळा पोलीस ठाण्याचा प्रभारी पदाचा कार्यभार सांभाळत असताना विविध प्रकरणांच्या हाताळणीत जबाबदारीचे गंभीर उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले. त्यांच्या कामकाजात झालेल्या दुर्लक्षामुळे पोलीस विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले होते.
संबंधित अधिकाऱ्यांकडून कर्तव्यातील अपेक्षित दक्षता न बाळगता निष्काळजीपणा झाल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी कठोर भूमिका घेत तात्काळ निलंबनाची कारवाई केली.पोलीस विभागात शिस्तभंग, हलगर्जीपणा आणि जबाबदारी टाळणाऱ्या कोणत्याही अधिकारी अथवा कर्मचाऱ्याला पाठीशी घातले जाणार नाही,असा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे. कर्तव्यपालनात कसूर करणाऱ्यांविरोधात यापुढेही कठोर पावले उचलली जातील, असा इशाराही पोलीस प्रशासनाने दिला आहे.या कारवाईमुळे पोलीस विभागात खळबळ उडाली असून जबाबदारीने काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे मनोबल वाढणार, तर निष्काळजी अधिकाऱ्यांमध्ये धाक निर्माण होणार असल्याची चर्चा पोलीस वर्तुळात सुरू आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे