Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

सिंदफळ जिल्हा परिषद सर्कलमध्ये भाजपचा विजय निश्चित : अमीर शेख

सिंदफळ जिल्हा परिषद सर्कलमध्ये भाजपचा विजय निश्चित : अमीर शेख

0 7 6 4 8 6

सिंदफळ जिल्हा परिषद सर्कलमध्ये भाजपचा विजय निश्चित : अमीर शेख

तुळजापूर | प्रतिनिधी

सिंदफळ जिल्हा परिषद सर्कलमध्ये यंदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष विजय मिळवणारच,असा ठाम विश्वास नव्याने भाजपमध्ये प्रवेश केलेले अपसिंगा येथील कार्यकर्ते अमीर शेख यांनी व्यक्त केला आहे.
आज दि.३१ जानेवारी सिंदफळ येथे पत्रकारांशी बोलताना अमीर शेख यांनी सांगितले की, जिल्हा परिषद सर्कलमधील मुस्लिम व अल्पसंख्यांक बांधवांनी मोठ्या संख्येने भाजपला मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी अपसिंगा,कामठा,कात्री,ढेकरी, अमृतवाडी या गावांमध्ये प्रत्यक्ष भेटीगाठी घेत जनसंवाद वाढवला असून,अल्पसंख्यांक समाजाला भाजपच्या मुख्य प्रवाहात अधिकाधिक जोडण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.या निवडणुकीत अल्पसंख्यांक समाजाचा विश्वास भाजपवर दृढ होत असून, त्याचा थेट लाभ भाजप उमेदवाराला होणार असल्याचा दावा त्यांनी केला. यावेळी सिंदफळ जिल्हा परिषद सर्कलचे निरीक्षक नगरसेवक दाजी पवार, गटप्रमुख अर्जुन कापसे, गणप्रमुख शंकर गोरे, सज्जनराव साळुंखे, उमेदवार पती आनंद ढाले, अपसिंगा उपसरपंच राहुल साठे, अभिजीत लोके तसेच परिसरातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे