ब्रेकिंगमहाराष्ट्र
बेंबळी येथील गंभीर मारहाण प्रकरणातील तिन्ही आरोपींची जिल्हा व सत्र न्यायालयाकडून जामिनावर मुक्तता
बेंबळी येथील गंभीर मारहाण प्रकरणातील तिन्ही आरोपींची जिल्हा व सत्र न्यायालयाकडून जामिनावर मुक्तता

0
7
6
4
9
7
बेंबळी येथील गंभीर मारहाण प्रकरणातील तिन्ही आरोपींची जिल्हा व सत्र न्यायालयाकडून जामिनावर मुक्तता
धाराशिव : धाराशिव तालुक्यातील बेंबळी येथील जुन्या वादाच्या कारणावरून झालेल्या मारहाण प्रकरणात अटकेत असलेल्या तिन्ही आरोपींना मे. जिल्हा व सत्र न्यायाधीश,धाराशिव यांनी दिनांक ०४ मार्च २०२६ रोजी जामीन मंजूर केला आहे.घटनेचा संक्षिप्त तपशील:
फिर्यादी तुकाराम गणपती जाधव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार,दि. ५ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ६:०० वाजण्याच्या सुमारास बेंबळी शिवारातील एका शेतात जुन्या वादातून त्यांना लोखंडी पाईप आणि कुऱ्हाडीने मारहाण करण्यात आली असल्याची तक्रारीवरून या प्रकरणी बेंबळी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ३३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
न्यायालयीन कार्यवाही:
सदर गुन्ह्यात पोलिसांनी खालील तीन आरोपींना दिनांक १७ फेब्रुवारी २०२६ रोजी अटक केली होती.
१. सागर बलभीम मुगळे
२. नवनाथ बलभीम मुगळे
३. बलभीम मुरलीधर मुगळे
हे तिन्ही आरोपी न्यायालयीन कोठडीत असताना, त्यांच्या वतीने मे. जिल्हा व सत्र न्यायालय,धाराशिव येथे नियमित जामिनासाठी ॲड एम.बी. माढेकर यांचे मार्फत जामीन अर्ज (क्र.९१/२०२६) दाखल करण्यात आला होता. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर, न्यायालयाने उपलब्ध परिस्थितीचा विचार करून व ॲड.एम.बी.माढेकर यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून तिन्ही आरोपींचा जामीन मंजूर केला आहे. सदर प्रकरणात ॲड धर्मराज सरडे व ॲड विशाल बारकूल यांनीही आरोपी तर्फे कामकाज पाहिले.
0
7
6
4
9
7



