ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय
शांततेत उत्साहवर्धक मतदान; तुळजापूरकरांचा लोकशाहीला सलाम! विनोद उर्फे पिटू गंगणे; तुळजापूरच्या विकासासाठी आणखी दृढनिश्चय!

0
6
7
8
4
1
शांततेत उत्साहवर्धक मतदान; तुळजापूरकरांचा लोकशाहीला सलाम!
विनोद उर्फे पिटू गंगणे; तुळजापूरच्या विकासासाठी आणखी दृढनिश्चय!
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर शहराने आज लोकशाहीचा खरा उत्सव साजरा करत नगरपरिषद निवडणुकीत अभूतपूर्व उत्साहाने मतदानाचा हक्क बजावला. सकाळच्या पहिल्या तासापासूनच मतदारांच्या रांगा दिसू लागल्या आणि दुपारी वातावरण अक्षरशः जत्रेची रंगत घेऊन गेले. तरुणाई, महिला, ज्येष्ठ नागरिक – सर्वच घटकांनी मतदानात जाहीर सहभाग नोंदवत लोकशाहीचे सामर्थ्य पुन्हा एकदा अधोरेखित केले.

मतदान केंद्रांवर पोलिसांचा चोख बंदोबस्त, निवडणूक आयोगाचे बारकाईने केलेले नियोजन आणि नागरिकांचा जबाबदार सहभाग यामुळे दिवसभर मतदान शांततेत पार पडले. अनेक ठिकाणी संपूर्ण कुटुंबांनी उत्साहाने मतदान करत लोकशाहीचा उत्सव अधिक रंगतदार बनवला.
दरम्यान, तुळजापूर नगरपरिषदेसाठी भारतीय जनता पक्षाकडून तब्बल २३ उमेदवार रिंगणात असून, शहरातील उत्साहपूर्ण मतदानाबद्दल नगराध्यक्ष विनोद उर्फे पिटू गंगणे यांनी सर्व तुळजापूरकरांचे मनःपूर्वक आभार मानले.

“तुळजापूरकरांनी आज लोकशाहीचा मान राखत प्रचंड उत्साहाने मतदान केले. आमच्या सर्व २३ उमेदवारांविषयी मतदारांनी दाखवलेला विश्वास प्रेरणादायी आहे. तुळजापूरचा सर्वांगीण विकास आणि नागरिकांच्या अपेक्षांची पूर्तता हाच आमचा दृढनिश्चय आहे,” असे गंगणे यांनी सांगितले.
राजकीय जाणकारांच्या मते, यंदाच्या सुव्यवस्थित आणि शांत मतदान प्रक्रियेने तुळजापूरकरांचा जागरूकपणा आणि लोकशाहीवरील विश्वास अधोरेखित झाला आहे. शहराने दाखवलेल्या आदर्श मतदान शिस्तीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
यावेळी तुळजापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी एकूण 29,661 पैकी 23,733 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून, 80.28% इतके विक्रमी मतदान झाले आहे.
आता सर्वांचे लक्ष २१ डिसेंबरच्या मतमोजणीकडे लागले असून, या मतदानातील उत्साहाचे राजकीय गणितात कोणते रंग उमटतात, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
0
6
7
8
4
1



