श्री गुरुदेव दत्त हायस्कूलमध्ये कायदेविषयक शिबिराचे आयोजन विद्यार्थ्यांनी शिस्तीचा अवलंब करून कायद्याचा आदर करावा – न्यायाधीश भगवान पंडित यांचे प्रतिपादन
श्री गुरुदेव दत्त हायस्कूलमध्ये कायदेविषयक शिबिराचे आयोजन विद्यार्थ्यांनी शिस्तीचा अवलंब करून कायद्याचा आदर करावा – न्यायाधीश भगवान पंडित यांचे प्रतिपादन
भूम : औदुंबर जाधव
तालुका विधी सेवा समिती व भूम तालुका वकील संघाच्या संयुक्त विद्यमाने श्री गुरुदेव दत्त हायस्कूलमध्ये कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा व सत्र न्यायालय भूम येथील माननीय न्यायाधीश श्री. भगवान पंडित हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून ॲड. पंडितराव ढगे अध्यक्ष तालुका वकील संघ, ॲड. शब्बीर सय्यद सचिव तालुका वकील संघ, तसेच संस्थेचे सचिव सतीश देशमुख, मुख्याध्यापक माधव भोसले, किरण जाधव, चंद्रकांत तांबे,पल्लवी नवगिरे मॅडम आणि विठ्ठल दहिटणेकर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. पोपट बांगर सर यांनी केले.
या प्रसंगी न्यायाधीश भगवान पंडित यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना “पोक्सो कायद्याचे महत्त्व, शिस्तीचे पालन व कायद्याचे राज्य टिकवण्याची जबाबदारी ही विद्यार्थ्यांची आहे,” असे प्रतिपादन केले. त्यांनी पुढे सांगितले की, “देशात संविधान आणि कायदा सर्वश्रेष्ठ आहे. कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही आणि सर्वांसाठी कायदा समान आहे. विद्यार्थ्यांनी देशाला महासत्ताक बनविण्यासाठी शिस्त, निष्ठा आणि आदर्श वर्तन अंगीकारावे.”
कार्यक्रमाला शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम’ने करण्यात आला.



