Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

तीर्थ बुद्रुकच्या महाराष्ट्र विद्यालयाचा दहावीत उत्तुंग निकाल; ९२.५९ टक्के यशाने परिसरात आनंदोत्सव

तीर्थ बुद्रुकच्या महाराष्ट्र विद्यालयाचा दहावीत उत्तुंग निकाल; ९२.५९ टक्के यशाने परिसरात आनंदोत्सव

0 7 6 4 8 6

तीर्थ बुद्रुकच्या महाराष्ट्र विद्यालयाचा दहावीत उत्तुंग निकाल; ९२.५९ टक्के यशाने परिसरात आनंदोत्सव

तुळजापूर : मार्च २०२६ मध्ये झालेल्या दहावी बोर्ड परीक्षेत तुळजापूर तालुक्यातील तीर्थ बुद्रुक येथील महाराष्ट्र विद्यालयाने उल्लेखनीय यश संपादन करत ग्रामीण भागातील शिक्षणाची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे. विद्यालयाचा एकूण निकाल ९२.५९ टक्के लागला असून, १०० टक्के विद्यार्थी अकरावी प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत.

विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवत शाळेचे नाव उंचावले आहे. गुणानुक्रमे विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत :

१) पृथ्वीराज श्रीकांत शिंदे – ८७.४० टक्के

२) सागर शाहुराज माने – ८७.२० टक्के

३) रेणुका किशोर माडजे – ८६ टक्के

४) प्राची अनंत माडजे – ८३.८० टक्के

५) सौदागर बालाजी ढेरे – ८१ टक्के

६) वैष्णवी ज्ञानेश्वर नावडे – ८०.८० टक्के

७) आर्य लक्ष्मण लोहार – ८० टक्के

विद्यालयाच्या या उल्लेखनीय यशाबद्दल परिसरातून विद्यार्थ्यांवर व शिक्षकांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ग्रामीण भागातील सामान्य कुटुंबातील विद्यार्थी मराठी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेत असताना मिळवलेले हे यश विशेष कौतुकास्पद मानले जात आहे.

ग्रामीण भागातील मराठी शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा शिक्षकांच्या कर्तृत्वातून आणि प्रभावी अध्यापनातून कायम ठेवली जात असल्याचे या निकालातून पुन्हा अधोरेखित झाले आहे. गावकऱ्यांकडून विद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी व पालकांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे