Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

उत्पादन शुल्कची हप्तेखोरी मुळावर! धाराशिव शहर पोलिसांचा धडाका; २ लाख ८ हजारांची दारू व वाहन जप्त

0 7 6 4 8 6

उत्पादन शुल्कची हप्तेखोरी मुळावर! धाराशिव शहर पोलिसांचा धडाका; २ लाख ८ हजारांची दारू व वाहन जप्त

धाराशिव : ज्ञानेश्वर गवळी

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून हप्तेखोरीला मूकसंमती दिली जात असताना धाराशिव शहर पोलिसांनी मात्र अवैध दारू व्यवसायावर जोरदार घाव घातला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १४ डिसेंबरच्या रात्री शहर पोलिसांनी केलेल्या कारवाईत विनापरवाना दारू वाहतूक करणारी टाटा सुमो पकडून तब्बल २ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

धाराशिव शहरात हातभट्टी, देशी व विदेशी दारूची चोरीछुप्या मार्गाने विक्री सुरू असून, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांकडून सातत्याने कारवाया होत आहेत. शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुमार दराडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शहरातील शांतता व कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी ठोस पावले उचलली जात आहेत.

१४ डिसेंबर रोजी रात्री साडेदहा वाजता मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार इंदिरानगर परिसरात सार्वजनिक सुविधेसमोर उभी असलेली टाटा सुमो (क्र. एमएच १४ सीएक्स ४५३७) तपासण्यात आली. तपासणीदरम्यान वाहनातून विविध नामांकित कंपन्यांची अंदाजे २८ हजार रुपये किमतीची दारू आढळून आली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

या कारवाईत दारूसह अंदाजे १ लाख ८० हजार रुपये किमतीची टाटा सुमो असा एकूण २ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस निरीक्षक कुमार दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार जाधवर व प्रवीण जमादार यांनी ही धडक कारवाई केली असून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निष्क्रियतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. जिल्ह्याच्या सीमेवरील भागात उघडपणे अवैध दारू व्यवसाय सुरू असताना उत्पादन शुल्क विभाग ‘मूग गिळून गप्प’ असल्याचा आरोप होत आहे. हप्ते गोळा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पाठीशी घातल्यामुळेच अवैध दारूचे धंदे जोमात सुरू असल्याची चर्चा रंगली आहे. लवकरच होणाऱ्या आढावा बैठकीत अधीक्षक हर्षवर्धन शिंदे यांचा सत्कार होणार असल्याची माहितीही चर्चेचा विषय ठरत आहे.

एकीकडे उत्पादन शुल्क विभागावर हप्तेखोरीचे आरोप होत असताना, दुसरीकडे धाराशिव ग्रामीण पोलिसांची ही कारवाई अवैध दारू व्यावसायिकांच्या पायाखालची वाळू सरकवणारी ठरली आहे.

1/5 - (1 vote)

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे