Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

धाराशिवच्या रणांगणात भाजपाची धडाकेबाज तयारी! राणाजगजितसिंह पाटील व माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्यावर धाराशिव जिल्ह्याच्या विजयाची जबाबदारी !

भाजपची रणनिती स्पष्ट-विकासाच्या मुद्द्यांवरच लढणार निवडणूक, आणि विजय निश्चितच ‘भाजपचा!’

0 6 7 8 4 1

धाराशिवच्या रणांगणात भाजपाची धडाकेबाज तयारी!

राणाजगजितसिंह पाटील व माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्यावर धाराशिव जिल्ह्याच्या विजयाची जबाबदारी !

धाराशिव : ज्ञानेश्वर गवळी
आगामी नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणशिंग फुंकले आहे.आचारसंहिता लागू होताच भाजपने जिल्हाभरात संघटनात्मक हालचालींना वेग देत निवडणूक प्रमुख ,प्रभारी नेत्यांची घोषणा केली आहे. धाराशिव जिल्ह्यातील आठ नगरपालिका व नगरपंचायतींसाठी आता निवडणूक नियोजनाची सूत्रे पक्षाच्या दोन मजबूत खांद्यांवर- माजी आमदार सुजितसिंह ठाकूर आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या वर सोपविण्यात आली आहेत.

भाजपने आपल्या नेहमीच्या संघटित पद्धतीने यावेळीही निवडणुकीचा रणनिती आराखडा तयार केला आहे. धाराशिव जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख म्हणून माजी आमदार सुजितसिंह ठाकूर व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची
नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्या कार्यकुशलतेचा आणि संघटनशक्तीचा अनुभव या मोहिमेत मोठा फायदा होणार आहे. या प्रभारीपदाच्या जबाबदारी सोपविण्यात आल्या आहेत. राणादादा यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांची फळी सध्या जिल्हाभरात जोशात कामाला लागली आहे.
दोन्ही नेत्यांनी आतापासूनच तालुकानिहाय बैठकींना प्रारंभ केला असून, प्रभागनिहाय रणनिती आखण्यास सुरुवात झाली आहे. उमेदवार निश्चितीपासून प्रचार नियोजनापर्यंत सर्व प्रक्रिया काटेकोरपणे पार पाडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पक्षाने दिलेल्या या जबाबदाऱ्यांना “विकास, संघटन आणि विजयसंकल्प” या त्रिसूत्रीवर चालविण्याचा निर्धार ठाकूर आणि राणादादा यांनी व्यक्त केला आहे.
धाराशिव जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत भाजपने जनतेचा विश्वास संपादन केला असून, आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पुन्हा कमळ फुलविण्याचा आत्मविश्वास कार्यकर्त्यांत दिसून येत आहे. ठाकूर यांच्या संघटनशक्तीला आणि राणादादा यांच्या नेतृत्वक्षमतेला एकत्रित जोड मिळाल्याने जिल्ह्यातील निवडणुकीची लढत भाजपसाठी अधिक बळकट होणार, असा विश्वास पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे.भाजपची रणनिती स्पष्ट-विकासाच्या मुद्द्यांवरच लढणार निवडणूक, आणि विजय निश्चितच ‘भाजपचा!’
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 7 8 4 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे