Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

स्वाभिमानी, निर्व्यसनी, निस्वार्थ सेवक सुनील घाडगे — वेताळ नगरच्या नगरसेवकसाठी सज्ज!

वेताळ नगरच्या जनतेचा लाडका ‘सुनील घाडगे’ — सेवाभावी उमेदवाराची नगरसेवकपदासाठी झेप!

0 7 6 4 8 6

जनतेचा सेवक… आता नगरसेवक कासाठी रिंगणात!

वेताळ नगरच्या नागरिकांच्या आग्रहावरून सुनील घाडगे निवडणुकीत उतरणार…

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर वेताळ नगर परिसरात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा रंगू लागली असून, नागरिकांच्या ठाम विनंतीवरून जनतेचा खरा सेवक म्हणून ओळख असलेले सुनील घाडगे यांनी या वेळेस नगरसेवक निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची घोषणा केली आहे.

वेताळ नगर परिसरातील सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच अग्रभागी असलेले घाडगे यांनी आतापर्यंत निराधार, संजय गांधी, श्रावणबाळ योजनांतर्गत लाभार्थ्यांचे कामे, तसेच तहसीलमार्फत महिलांच्या पगारी शासकीय कामांची पाठपुरावा करून अनेकांना न्याय मिळवून दिला आहे.

स्थानिक नागरिकांच्या हितासाठी वीजपुरवठा, लाईट व्यवस्था, रस्ते, घरकुल योजना अशा विविध समस्यांवर त्यांनी नेहमीच लढा दिला. आंदोलन, उपोषण आणि जनतेसाठी सतत धावपळ करणारे घाडगे हे वेताळ नगरातील सर्वच घटकांमध्ये लोकप्रिय व्यक्तिमत्व आहे.

बालपण आणि तरुणपण याच गल्लीत गेले असल्याने परिसरातील प्रत्येक घराशी त्यांचे आपुलकीचे नाते आहे. गेली दहा वर्षे जनतेसाठी निःस्वार्थ सेवा बजावणाऱ्या सुनील घाडगे यांना आता नागरिकांनी “तुम्हीच आमचे नगरसेवक व्हा!” असा आग्रह धरला आहे.

निर्व्यसनी, स्वाभिमानी आणि जनतेसाठी नेहमी तत्पर असलेले सुनील घाडगे यांनी या जनतेच्या अपेक्षेचा मान राखत, “जनतेची सेवा हाच माझा धर्म” या भावनेतून यंदाच्या नगरसेवकपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरायचे ठरवले आहे, असे सुनिल घाडगे यांनी तुळजापूरनामा न्युजशी बोलताना सांगितले.

5/5 - (1 vote)

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे