Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

सकल नाभिक समाजाचे लाक्षणिक उपोषण; अतिक्रमण हटविण्याची मागणी

नगराध्यक्षांच्या आश्वासनानंतर समाजाच्या वतीने लाक्षणिक उपोषण मागे

0 7 6 4 8 6

सकल नाभिक समाजाचे लाक्षणिक उपोषण; अतिक्रमण हटविण्याची मागणी

नगराध्यक्षांच्या आश्वासनानंतर समाजाच्या वतीने लाक्षणिक उपोषण मागे

तुळजापूर : येथील वेताळ नगर भागात प्रस्तावित श्री संत सेना महाराज सांस्कृतिक सभागृहाच्या जागेवर वाढलेल्या अतिक्रमणाच्या विरोधात सकल नाभिक समाज तुळजापूर यांच्या वतीने लाक्षणिक उपोषण करण्यात आले. या मागणीसंदर्भात नगरपालिका व संबंधित प्रशासनाला वेळोवेळी निवेदन सादर करूनही ठोस कारवाई होत नसल्याने समाजबांधवांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला.

नाभिक समाज तुळजापूर परिसरात दीर्घकाळापासून सेवाकार्य करत असून समाजाचे आराध्य संत श्री सेना महाराज यांची पुण्यतिथी दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या पार्श्वभूमीवर तुळजापूर येथे समाजासाठी सांस्कृतिक सभागृह व्हावे, यासाठी मागील सुमारे ४० वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. नगराध्यक्ष विनोद गंगणे यांच्या पुढाकारातून आमदार राणाजगजितसिंह यांच्या माध्यमातून सभागृहासाठी २५ लाखांचा निधी उपलब्ध झाला असून बांधकामालाही सुरुवात झाली आहे.

मात्र, नियोजित जागेवर शेजारील काही नागरिकांनी अनेक वर्षांपासून अतिक्रमण केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे मूळ आराखड्यानुसार बांधकामास अडथळा निर्माण होत असल्याने ते अतिक्रमण तात्काळ हटविण्यात यावे, ही प्रमुख मागणी करण्यात आली.या लाक्षणिक उपोषणास शहरातील सर्व नाभिक बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत एक दिवस सलून दुकाने बंद ठेवून निषेध व्यक्त केला. मोठ्या संख्येने व्यावसायिक आणि समाजबांधव आंदोलनात सहभागी झाले होते.

तात्काळ कारवाई करून अतिक्रमण हटवले जाईल – नगराध्यक्ष विनोद गंगणे

शहरातील नियोजीत जागेवरील दोन दिवसांत पोलीस संरक्षणात अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात येणार असून संबंधितांना नोटिसा देण्यात आल्याची माहिती देण्यात आली. मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांनाही तातडीने कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. उपोषणस्थळी नगराध्यक्ष विनोद गंगणे, नगरसेवक औदुंबर कदम, उपनगराध्यक्ष रामचंद्र रोचकरी, विशाल रोचकरी, किशोर साठे, रत्नदीप भोसले, दिनेश क्षीरसागर, पंडितराव जगदाळे, अमर हंगरगेकर, सागर कदम, अनंत सावंत, नरेश अमृतराव, आनंद कंदले, राजेश्वर कदम, श्री गवळी आदींसह नगरपालिका अतिक्रमण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. त्यांनी समाजबांधवांशी संवाद साधत उपोषण मागे घेण्याची विनंती केली. नगराध्यक्षांच्या आश्वासनानंतर समाजाच्या वतीने लाक्षणिक उपोषण मागे घेण्यात आले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे