ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय
२९ हजार ५५४ मतदार ठरवणार तुळजापूर नगराध्यक्ष व नगरसेवक
तुळजापूर नगरपरिषदेत १० प्रभागांमधून २२ नगरसेवक व एक अध्यक्ष पदासाठी होणार मतदान !
0
7
6
4
8
7
२९ हजार ५५४ मतदार ठरवणार तुळजापूर नगराध्यक्ष व नगरसेवक
तुळजापूर नगरपरिषदेत १० प्रभागांमधून २२ नगरसेवक व एक अध्यक्ष पदासाठी होणार मतदान !
राजकीय हालचालींना वेग; प्रभागनिहाय आरक्षण जाहीर
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर नगरपरिषद निवडणुकांचा बिगुल वाजला असून आगामी निवडणूक प्रक्रियेला आता जोरदार वेग आला आहे. राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केल्यानंतर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यंदाच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासह ११ प्रभागांमधून एकूण २३ नगरसेवकांची निवड करण्यात येणार असून २९ हजार ५५४ मतदार आपल्या प्रतिनिधींचे भवितव्य ठरवणार आहेत.
यंदाच्या नगरपरिषद निवडणुकांची मतदान तारीख २ डिसेंबर २०२५, तर मतमोजणी ३ डिसेंबर २०२५ रोजी होणार आहे. नगराध्यक्ष पदासोबतच प्रत्येक प्रभागातील दोन जागांसाठी मतदान होत असल्याने एका मतदाराला किमान तीन मतदान करावे लागणार आहे. विशेष म्हणजे प्रभाग ११ मध्ये चार वेळा मतदान करावे लागणार असल्याने मतदारांच्या सहभागाचे महत्त्व वाढले आहे.
▪️मतदानाचे प्रमाण वाढवण्यासाठी जनजागृती महत्त्वाची
निवडणूक आयोगाने मतदानातील उदासीनता कमी करण्यावर यंदा विशेष भर दिला आहे. जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी तसेच सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना व्यापक मतदार जागृती मोहिमा राबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पारंपरिक माध्यमांसोबतच सोशल मीडिया, व्हिडिओ संदेश,डिजिटल बॅनर आदी आधुनिक साधनांचा प्रभावी वापर करण्याचे निर्देश आयोगाने १२ जून २०२५ रोजी दिलेल्या पत्राद्वारे कळवले आहेत.
▪️निवडणूक प्रक्रिया — महत्वाच्या तारखा
नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यास सुरुवात : १० नोव्हेंबर २०२५,नामनिर्देशनाची अंतिम तारीख : १७ नोव्हेंबर २०२५,
छाननी : १८ नोव्हेंबर २०२५,
माघार (अपील नसल्यास) : २१ नोव्हेंबर २०२५,माघार (अपील असल्यास) : २५ नोव्हेंबर २०२५,
मतदान : २ डिसेंबर २०२५,
मतमोजणी : ३ डिसेंबर २०२५
▪️प्रभागनिहाय आरक्षण जाहीर
तुळजापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी पुढीलप्रमाणे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.
१) तुळजापूर खुर्द – सर्वसाधारण महिला
२) हाडको, विश्वानगर – अनु. जाती, सर्वसाधारण महिला
३) जिजामाता नगर – ना.मा.प्र. (महिला), सर्वसाधारण
४) मंकावती, आर्य चौक – ना.मा.प्र., सर्वसाधारण महिला
५) खडकाळ गल्ली – अनु.जाती (महिला), सर्वसाधारण
६) आराधवाडी – अनु.जाती, सर्वसाधारण महिला
७) जवाहर गल्ली – ना.मा.प्र. (महिला), सर्वसाधारण
८) वेताळ नगर – अनु.जाती (महिला), सर्वसाधारण
९) घाटशिळ – ना.मा.प्र., सर्वसाधारण महिला
१०) नळदुर्ग रोड – ना.मा.प्र., सर्वसाधारण महिला
११) विशेष प्रभाग – ना.मा.प्र. (महिला), सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण
निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच शहरातील राजकीय हालचालींना उधाण आले आहे. संभाव्य उमेदवारांच्या भेटीगाठी, गटबाजी, रणनीती यामुळे वातावरण चढ-उतार अनुभवत आहे. प्रभागनिहाय आरक्षण जाहीर झाल्यानंतर अनेकांच्या राजकीय गणितांमध्ये मोठे बदल घडले आहेत. आगामी आठवड्यात अर्ज भरण्यासह औपचारिक निवडणूक रंगणार असून तुळजापूर शहरातील रस्सीखेच आणखी तीव्र होणार हे निश्चित.
0
7
6
4
8
7



