Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

तुळजापूर नगरपालिका निवडणुकीत हृदयद्रावक घटना मतदानासाठी आलेल्या ज्येष्ठ मतदार महिलेला अचानक झटका; उपचारादरम्यान मृत्यू

तुळजापूर नगरपालिका निवडणुकीत हृदयद्रावक घटना मतदानासाठी आलेल्या ज्येष्ठ मतदार महिलेला अचानक झटका; उपचारादरम्यान मृत्यू

0 7 6 4 9 7

तुळजापूर नगरपालिका निवडणुकीत हृदयद्रावक घटना मतदानासाठी आलेल्या ज्येष्ठ मतदार महिलेला अचानक झटका; उपचारादरम्यान मृत्यू

तुळजापूर : प्रतिनिधी

तुळजापूर नगरपालिका निवडणुकीत मतदान प्रक्रिया उत्साहात सुरू असताना दुपारी १२ ते १ च्या सुमारास घडलेल्या एका अनपेक्षित घटनेने शहरभर हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रभाग क्रमांक ९/२ मधील ज्येष्ठ मतदार राजश्री सदाशिव भोसले (वय ६५) या मतदानासाठी आल्या असताना त्यांना अचानक चक्कर येऊन त्या कोसळल्या.

मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी तसेच उपस्थित नागरिकांनी तत्परता दाखवत त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालय, तुळजापूर येथे हलविले. उपचारासाठी दाखल केल्यानंतर काही वेळाने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.

तहसीलदार कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार ही घटना अचानक घडली असून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक चोरमुले यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.२९ नोव्हेंबर रोजी शनिवारीच राजश्री सदाशिव भोसले यांना हृदयविकाराचा हलका झटका आला होता. त्यावेळी त्यांना आवश्यक ती औषधोपचाराची कव्हर देऊन पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले होते. मात्र आज दि.२ डिसेंबर रोजी मतदानाला आल्यावर प्रकृती अचानक बिघडून ही दुर्दैवी घटना घडली.

मतदानाच्या दिवशी घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांसह प्रशासनाकडूनही दुःख व्यक्त करण्यात येत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 9 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे