Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

तुळजापूरच्या विकासाचा शिल्पकार कै.नरेंद्र बोरगावकर- पहिल्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन…

शिक्षण, साखर, सेवा — कै. नरेंद्र बोरगावकर यांचे कार्य आजही प्रेरणादायी

0 7 6 4 8 7

तुळजापूरच्या विकासाचा शिल्पकार कै.नरेंद्र बोरगावकर- पहिल्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन…

शिक्षण,साखर, सेवा- कै. नरेंद्र बोरगावकर यांचे कार्य आजही प्रेरणादायी

तुळजापूर; ज्ञानेश्वर गवळी

तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र बोरगावकर यांचा दि.१० ऑक्टोंबर रोजी पहिला स्मृतिदिन साजरा होत आहे. या निमित्ताने त्यांनी केलेल्या कार्याचा आणि राजकारणातील त्यांची कारकीर्द याकडे पाहिल्यास असता असा नेता पुन्हा होणे नाही असेच म्हणावे लागेल.

तुळजापूर तालुक्याच्या राजकारणामध्ये माजी आमदार कै.नरेंद्र बोरगावकर हे अत्यंत आदरणीय असेच नाव आहे. प्रदीर्घकाळ जनतेची सेवा करून त्यांनी गोरगरीब जनतेला आपल्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये न्याय दिला.१९४९ मध्ये त्यांनी आपसिंगा येथील नरेंद्र आर्य विद्यालयाची स्थापना केली. १९६२ मध्ये त्यांनी पंचायत समितीची निवडणूक लढवून ते सभापती झाले. याच काळात त्यांनी ग्रामीण भागातील जनतेची भरीव सेवा केली.१९७१ मध्ये बालाघाट शिक्षण संस्थेची स्थापना,१९७४ मध्ये त्यांनी लातूर आणि धाराशिव जिल्हा एकत्र असणाऱ्या उस्मानाबाद जिल्ह्या परिषदेचे अध्यक्ष पद मिळवून संपूर्ण जिल्ह्यावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. या काळात त्यांनी डॉ.पद्मसिंह पाटील, विलासराव देशमुख,शिवाजीराव निलंगेकर,शिवाजीराव बाभळगावकर,मधुकरराव चव्हाण, सि. ना. आलूरे गुरुजी, भाई उद्धवराव पाटील,अरविंद गोरे, एल एल पाटील, साहेबराव हंगरगेकर काम करीत धाराशिव जिल्ह्याच्या विकासाला हातभार लावला.

तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखाना त्यांच्याच नेतृत्वाखाली स्थापन झाला पंधरा वर्षे नरेंद्र बोरगावकर साहेब चेअरमन म्हणून कार्यरत होते १९९७ मध्ये महाराष्ट्र राज्य साखर महासंघाने राज्यातील आदर्श साखर कारखाना म्हणून या कारखान्याला सन्मानित केले. १९९५ ते २००१ या काळात त्यांनी विधान परिषदेवर प्रतिनिधित्व करून संपूर्ण मराठवाड्यांच्या विकासाला चालना देण्यासाठी विधान परिषदेमध्ये कामकाज केले. आपल्या संपूर्ण कार्यकाळात सामान्य गोरगरीब जनतेला आधार देण्याचे आणि त्यांच्या कल्याणासाठी शासनाच्या योजना राबविण्यासाठी माजी आमदार नरेंद्र बोरगावकर यांनी केलेले कार्य आजही सर्वांना स्मरणीय आहे त्यांच्या या पहिल्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे