Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

बीआयटीमध्ये “TECH-BIT 2K25” उत्साहात संपन्न;विजेत्यांसाठी २ लाखांहून अधिक बक्षिसांचे वाटप

0 6 7 8 4 1

बीआयटीमध्ये “TECH-BIT 2K25” उत्साहात संपन्न;विजेत्यांसाठी २ लाखांहून अधिक बक्षिसांचे वाटप

भूम : प्रतिनिधी

जेएसपीएम पुणे संचलित भगवंत अभियांत्रिकी महाविद्यालय (बीआयटी कॉलेज) येथे “TECH-BIT 2K25” हा एकदिवसीय तांत्रिक महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. या महोत्सवाचे उद्घाटन संकुल संचालक ऋतुराज सावंत यांच्या हस्ते झाले. प्राचार्य डॉ. एच. व्ही. शेटे यांनी प्रास्ताविक करून या उपक्रमामागील हेतू आणि विद्यार्थ्यांना तांत्रिक ज्ञानासोबत प्रत्यक्ष अनुभव मिळावा हा उद्देश स्पष्ट केला.

अध्यक्षीय भाषणात ऋतुराज सावंत यांनी विद्यार्थ्यांच्या सहभागाचे कौतुक करत भविष्यातही त्यांच्या सुप्त प्रतिभेला व्यासपीठ मिळावे यासाठी अधिक उपक्रम आयोजित करण्याचा संकल्प व्यक्त केला.

या तांत्रिक महोत्सवात ६०० हून अधिक विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. धाराशिव व सोलापूर जिल्ह्यातील स्वेरी कॉलेज, सिद्धेश्वर वूमन्स पॉलीटेक्निक, एन. बी. नवले सिंहगड कॉलेज, के. टी. पाटील कॉलेज, श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय, बीजीसी, व्ही.व्ही.पी.आय.टी., बीएमआयटी आदी महाविद्यालयांचे विद्यार्थी सहभागी झाले होते.

◾रोबो रेस स्पर्धा
डिप्लोमामध्ये बीआयटीच्या आदेश गवळी प्रथम, वेदांत गरड द्वितीय, तर रोहित भुसारे तृतीय ठरले. डिग्री विभागात गीतांजली स्वामी व ग्रुप विजेते ठरले.

मॉडेल मेकिंग
डिप्लोमामध्ये रत्नदीप खरावने प्रथम, अनुष्का कोकाटे व वैभवी कांबळे अनुक्रमे द्वितीय व तृतीय ठरल्या. डिग्री विभागात संजना काटबु व ग्रुप प्रथम, काझी ताझिला व ग्रुप द्वितीय, तर शेख तरन्नुम व ग्रुप तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले.

ब्लाइंड कोड
बीआयटीच्या सुफिया शेख प्रथम, सानिया पठाण द्वितीय, तर शिवम स्वामी तृतीय ठरले.

सर्किट सुडोकू
डिप्लोमामध्ये मोरे आदित्य (सिंहगड कॉलेज) प्रथम, तर बीआयटीचे शाहिदरझा बागवान व यश वाघमारे अनुक्रमे द्वितीय व तृतीय. डिग्री विभागात सुरज पोगूळ (सिंहगड कॉलेज) प्रथम, तर संतोषी राऊत व प्रणव धस (बीआयटी) द्वितीय व तृतीय.

मिरर कोड
व्ही.व्ही.पी.च्या समृद्धी बाबर प्रथम, तर बीआयटीच्या प्रथमेश कुंभार व अल्फा शेख अनुक्रमे द्वितीय व तृतीय ठरले.

ब्लाइंड सी
संगमेश्वर कॉलेजच्या रुचा साळुंके प्रथम, तर बीआयटीच्या धीरज वीर व स्नेहा सोनवणे द्वितीय व तृतीय.

आयडियाथॉन (पोस्टर प्रेझेंटेशन)
डिप्लोमा विभागात बीआयटीच्या गायत्री बारगजे प्रथम, आदित्य सातपुते द्वितीय, आल्फीया शेख तृतीय. डिग्री विभागात चारकपल्ली गायत्री (एस.ई.एस. कॉलेज) प्रथम, पियुष चोपडे द्वितीय, तर सायली कानडे तृतीय.

बीजीएमआय स्पर्धेत बीआयटीच्या संतोष वाघोलीकर यांनी यश मिळविले.

या सर्व विजेत्यांना एकूण दोन लाख रुपयांहून अधिक बक्षिसे, प्रमाणपत्रे व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आली. सहभागी विद्यार्थ्यांसाठी अल्पोपहाराची सोय करण्यात आली होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुष्का जाधव व सागर वाघमारे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. अर्चना आवटे यांनी सहसंयोजक प्रा. वाघमारे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आभार मानत केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 7 8 4 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे