Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

ग्रामीण पोलीस स्टेशनची आक्रमक कारवाई; अवैध दारूविक्रीप्रकरणी एकास अटक

0 7 6 4 8 6

ग्रामीण पोलीस स्टेशनची आक्रमक कारवाई; अवैध दारूविक्रीप्रकरणी एकास अटक

धाराशिव | प्रतिनिधी

धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याने अवैध दारूविक्रीविरोधात आक्रमक भूमिका घेत मोठी कारवाई केली आहे. दि. 24 जानेवारी 2026 रोजी दुपारी सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास कौडगाव तांडा (बार्शी रोड) येथील बस थांब्याजवळ संशयित इसम अवैधरित्या दारू विक्रीसाठी दारू साठवून ठेवल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ छापा टाकला.या कारवाईत गणेश मारुती जाधव (रा. कौडगाव तांडा, बार्शी रोड, ता. जि. धाराशिव) याच्या ताब्यातून अंदाजे ₹640 किंमतीच्या देशी व विदेशी दारूच्या 16 सिलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या. आरोपी हा सदर दारू अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगत असल्याचे निष्पन्न झाले.
याप्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम 65(ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.ग्रामीण भागात अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांची ही कारवाई कौतुकास्पद मानली जात असून, अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे