लातूर विभागीय कुस्ती स्पर्धेत रविंद्र हायस्कूलचा रोहित माने पुन्हा एकदा विजेता;राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड !

भूम : प्रतिनिधी
लातूर येथे नुकत्याच पार पडलेल्या विभागीय कुस्ती स्पर्धेत रविंद्र हायस्कूल,भूमचा कुस्तीपटू रोहित माने याने आपले वर्चस्व कायम ठेवत सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक पटकाविला आहे. १७ वर्षे वयोगट व ६० किलो वजनी गटात त्याने प्रभावी कामगिरी करत विभागात अव्वल स्थान मिळवले असून आता त्याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल रोहित मानेचा तसेच त्याच्या मार्गदर्शक क्रीडा प्रशिक्षक अमर सुपेकर (NIS कबड्डी कोच) यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. या वेळी उपस्थितांनी दोघांचे अभिनंदन करत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाला संस्थेचे सचिव आर. डी.सुळ, मुख्याध्यापक उत्तम सुरवसे,उपमुख्याध्यापिका शर्मिला पाटील, पर्यवेक्षक मिलिंद लगाडे, धनंजय पवार, भागवत लोकरे,रविंद्र प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मण देशमुख तसेच शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.रोहित मानेच्या या यशामुळे रविंद्र हायस्कूलमध्ये आनंदाचे व अभिमानाचे वातावरण पसरले आहे.