Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

धाराशिव : इंस्टाग्रामवर आयडी काढण्याच्या आमिषाने ऑनलाईन फसवणूक!

धाराशिव : इंस्टाग्रामवर आयडी काढण्याच्या आमिषाने ऑनलाईन फसवणूक!

0 7 6 4 9 7

धाराशिव : इंस्टाग्रामवर आयडी काढण्याच्या आमिषाने ऑनलाईन फसवणूक!

धाराशिव : प्रतिनिधी

विश्वास संपादन करून इंस्टाग्रामवर कंपनीचा आयडी काढण्याच्या नावाखाली ऑनलाईन फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. आनंदनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पवन जाधव, रा. लोहारा ता. लोहारा, जि. धाराशिव याने फिर्यादी विलास मधुकर देशमुख (वय ४२, रा. पोहनेर) यांना “कंपनीचे घरबसल्या ऑनलाईन काम आहे, त्यासाठी इंस्टाग्रामवर कंपनीचा आयडी काढावा लागेल” असे सांगून विश्वासात घेतले. त्यानंतर बजाज फायनान्स, धाराशिव येथे बनावट आयडी तयार करून २५,९७५ चे लोन मंजूर करून घेत फिर्यादीची फसवणूक केली.

या घटनेबाबत फिर्यादी विलास देशमुख यांनी दि. ०४ नोव्हेंबर २०२५ रोजी आनंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी पवन जाधव याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास आनंदनगर पोलीस करत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 9 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे