Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

गोवंशीय जनावरांची कत्तलीसाठी निर्दय वाहतूक! पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांच्या नेतृत्वाखाली धाराशिव ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; पाच जर्शी गायींची सुटका, चालकावर गुन्हा दाखल

गोवंशीय जनावरांची कत्तलीसाठी निर्दय वाहतूक! पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांच्या नेतृत्वाखाली धाराशिव ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; पाच जर्शी गायींची सुटका, चालकावर गुन्हा दाखल

0 6 7 8 4 1

गोवंशीय जनावरांची कत्तलीसाठी निर्दय वाहतूक!

पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांच्या नेतृत्वाखाली धाराशिव ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; पाच जर्शी गायींची सुटका, चालकावर गुन्हा दाखल

धाराशिव | ज्ञानेश्वर गवळी

गोवंशीय जनावरांच्या बेकायदेशीर वाहतुकीवर धाराशिव ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत पशुक्रूरतेचा कळस गाठणारा प्रकार उघडकीस आणला आहे. दिनांक 23 जानेवारी 2026 रोजी पहाटे 3.20 वाजता राष्ट्रीय महामार्ग 52 वरील आळणी पाटीजवळ MH 11 BL 9840 क्रमांकाच्या पिकअप वाहनातून कत्तलीसाठी निर्दयपणे नेल्या जात असलेल्या पाच जर्शी गायी पोलिसांनी ताब्यात घेतल्या.या संपूर्ण कारवाईचे नेतृत्व पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांनी केले. गोपनीय माहिती मिळताच त्यांनी तात्काळ हालचाली सुरू करत रात्रीच विशेष पथक तयार केले आणि महामार्गावर सापळा रचला. त्यांच्या सतर्क नेतृत्वामुळे ही अमानुष वाहतूक वेळीच थांबवण्यात यश आले.
पोलिसांनी तपास केला असता वाहनात जनावरांना ना चारा, ना पाणी, ना मोकळी जागा देण्यात आली होती. पूर्णतः अमानुष पद्धतीने कोंबून कत्तलीसाठी नेले जात असल्याचे स्पष्ट झाले. अंदाजे १ लाख ६५ हजार रुपये किंमतीची गोवंशीय जनावरे पोलिसांच्या तत्परतेमुळे मृत्यूपासून वाचली.या प्रकरणी वाहनचालकाविरुद्ध प्राण्यांशी क्रूरतेने वागण्यास प्रतिबंध अधिनियम 1960 अंतर्गत कलम 11(1)(ड) सह 5, 5(अ), 5(ब), 9(अ) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.रात्रीच्या अंधारात सुरू असलेली कत्तल-वाहतूक उधळून लावून पोलीस निरीक्षक वसंत मोरे यांच्या नेतृत्वाखालील धाराशिव ग्रामीण पोलिसांनी पशुहत्येविरोधात ठोस इशारा दिला आहे. कायदा मोडणाऱ्यांना थेट जेलचा रस्ता दाखवला जाईल, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.
या धडक कारवाईमुळे पशुप्रेमी आणि नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 7 8 4 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे