ब्रेकिंगमहाराष्ट्र
तपासासाठी गेलेल्या तुळजापूर पोलीस दलातील एएसआय धनंजय कवडे यांचे लोणावळ्यात हृदयविकाराने निधन
तपासासाठी गेलेल्या तुळजापूर पोलीस दलातील एएसआय धनंजय कवडे यांचे लोणावळ्यात हृदयविकाराने निधन

0
7
6
5
0
7
तपासासाठी गेलेल्या तुळजापूर पोलीस दलातील एएसआय धनंजय कवडे यांचे लोणावळ्यात हृदयविकाराने निधन
तुळजापूर : तुळजापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ए.एस.आय.) चालक धनंजय मारुतीराव कवडे (वय ५५, बक्कल क्रमांक ५९९) रा. धाराशिव यांचे लोणावळा येथे ड्युटीवर कार्यरत असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी निधन झाले. अधिकारी कर्मचारी सहकार्यानी तात्काळ उपचारास नेले परंतु डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले ही घटना दि.१० ते दि.११ एप्रिलच्या पहाटे घडली असून, पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, कवडे हे मुंबई-ठाणे परिसरात अधिकारी तसेच कर्मचारी घेऊन तपास कामासाठी गेले होते. कामानिमित्त उशीर झाल्याने त्यांनी लोणावळा येथे मुक्काम केला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी पुढील कामासाठी रवाना होण्याचा त्यांचा मानस असतानाच, रात्रीच अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले.या तपास मोहिमेत त्यांच्यासोबत इतर पोलीस अधिकारी व कर्मचारीही उपस्थित होते. अनेक वर्षे प्रामाणिकपणे सेवा बजावत त्यांनी विविध ठिकाणी काम केले होते. तुळजापूर येथेही त्यांनी दीर्घकाळ सेवा बजावत पोलीस दलात आपली वेगळी ओळख निर्माण केली होती.त्यांच्या आकस्मिक निधनामुळे सहकारी, मित्रपरिवार व कुटुंबीयांमध्ये शोककळा पसरली असून, सर्व स्तरातून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.
0
7
6
5
0
7



