Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

अजितदादांना अखेरचा निरोप… अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी श्रीकृष्ण सूर्यवंशींनी घेतले अंतिम दर्शन

अजितदादांना अखेरचा निरोप… अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी श्रीकृष्ण सूर्यवंशींनी घेतले अंतिम दर्शन

0 7 6 4 8 6

अजितदादांना अखेरचा निरोप… अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी श्रीकृष्ण सूर्यवंशींनी घेतले अंतिम दर्शन

तुळजापूर | प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा कणखर नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे अजितदादा पवार यांच्या अस्थी विसर्जन सोहळ्यास तुळजापूर तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष तथा दादांचे निकटवर्तीय सहकारी श्रीकृष्ण सूर्यवंशी यांनी दि.३० जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे उपस्थित राहून भावनिक श्रद्धांजली अर्पण केली. दादांचे अंतिम दर्शन घेताना सूर्यवंशी यांच्या डोळ्यांत अश्रू होते आणि मनात आठवणींचा पूर दाटून आला होता.अजितदादा म्हणजे केवळ नेता नव्हते, तर कार्यकर्त्यांना बळ देणारे, संकटात धीर देणारे आणि कामातून नेतृत्व शिकवणारे मार्गदर्शक होते, अशा भावना सूर्यवंशी यांनी यावेळी व्यक्त केल्या. “काम बोला” हीच त्यांची ओळख होती. राजकीय संघर्ष असो वा विकासाचा प्रश्न, दादांनी कधीही तडजोड केली नाही. महाराष्ट्राच्या विकासाचा वेग वाढवणारे नेतृत्व आज काळाच्या पडद्याआड गेले, ही जाणीव प्रत्येक कार्यकर्त्याला पोरके करून गेली आहे, असे त्यांनी नम्र शब्दांत सांगितले.अस्थी विसर्जनाच्या वेळी उपस्थित असलेले हजारो कार्यकर्ते आणि नागरिक स्तब्ध झाले होते. प्रत्येकाच्या मनात एकच भावना होती – दादांचे विचार, त्यांची कामाची शिस्त आणि सामान्य माणसासाठीची तळमळ हीच त्यांना खरी श्रद्धांजली आहे. अजितदादा पवार यांचे कार्य आणि विचार कायम प्रेरणादायी राहतील, अशा भावना यावेळी सर्वत्र व्यक्त होत होत्या.

5/5 - (1 vote)

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे