Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

भुम पोलीसांचा गावठी दारू विक्रेत्यांवर धडक कारवाई; चार महिलांकडून दारूसह साहित्य जप्त

दारूबंदीला चुकविणाऱ्यांवर पोलिसांची कडक नजर!

0 7 6 4 9 7

भुम पोलीसांचा गावठी दारू विक्रेत्यांवर धडक कारवाई; चार महिलांकडून दारूसह साहित्य जप्त

दारूबंदीला चुकविणाऱ्यांवर पोलिसांची कडक नजर!

भुम : प्रतिनिधी

भुम पोलीस ठाण्याच्या पथकाने अवैध दारू विक्रीविरोधात राबविलेल्या मोहिमेत चार ठिकाणी धाड टाकून चार महिलांकडून गावठी दारूसह साहित्य जप्त केले. ही कारवाई सोमवारी सकाळी शहरातील विविध भागात करण्यात आली.

पहिल्या कारवाईत कविता संजय काळे (वय 38, रा. कल्याणनगर, भुम) हिला बसस्थानकाजवळ मोकळ्या जागेत अंदाजे 500 रुपयांची पाच लिटर गावठी दारूसह पकडण्यात आले. दुसऱ्या प्रकरणात सखुबाई उत्तम काळे (वय 50, रा. कसबा भुम) हिच्याकडून अंबाबाई मंदिराजवळ अंदाजे 500 रुपयांची पाच लिटर दारू जप्त करण्यात आली.

तिसऱ्या ठिकाणी ताईबाई अंकुश पवार (वय 50, रा. इंदिरानगर, भुम) हिच्याकडून आठवडी बाजार कट्ट्याजवळ अंदाजे 500 रुपयांची पाच लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली. चौथ्या ठिकाणी गयाबाई बजरंग काळे (वय 50, रा. लक्ष्मीनगर, भुम) हिच्या राहत्या घरासमोर अंदाजे 800 रुपयांची आठ लिटर गावठी दारू निर्मितीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव जप्त करण्यात आले.

या सर्वांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हे नोंदविण्यात आले असून, पुढील तपास भुम पोलीस ठाण्याचे पथक करीत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 9 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे