Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

व्यापाऱ्यांच्या आंदोलनाला यश; नगराध्यक्षांच्या मध्यस्थीनंतर तोडगा !

महाद्वार परिसरातील दुकानदारांना एक फूट फुटपाथ व तीन फूट सायवानची परवानगी देण्याचे आश्वासन !

0 7 6 4 8 6

व्यापाऱ्यांच्या आंदोलनाला यश; नगराध्यक्षांच्या मध्यस्थीनंतर तोडगा !

महाद्वार परिसरातील दुकानदारांना एक फूट फुटपाथ व तीन फूट सायवानची परवानगी देण्याचे आश्वासन !

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी साडेतीन शक्तीपीठापैकी पूर्ण शक्तिपीठ असलेल्या आई भवानीच्या पुण्य पावन नगरीत अतिक्रमण हटाव मोहिमेनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे नाराज झालेल्या महाद्वार परिसरातील व्यापाऱ्यांनी नगरपरिषद प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर अखेर नगराध्यक्ष विनोद गंगणे आणि मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांनी व्यापाऱ्यांसोबत चर्चा करून तोडगा काढला. नगराध्यक्षांनी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केल्यानंतर व्यापाऱ्यांना एक फूट फुटपाथ व तीन फूट सायवान वापरण्यास परवानगी देण्याचे आश्वासन दिले.नगरपरिषदेने काही आठवड्यांपूर्वी राबविलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे महाद्वार चौक मोकळा झाला असला तरी अनेक व्यापाऱ्यांवर आर्थिक परिणाम झाला होता. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मालाची सुरक्षितता आणि व्यवसाय टिकविण्यासाठी व्यापाऱ्यांनी तीन फूट फुटपाथ व पाच फूट सायवानची मागणी केली होती.यासंदर्भात भवानी रोड व महाद्वार रोड परिसरातील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून आंदोलन सुरू केले. तसेच मंदिर संस्थानमार्फत बंद करण्यात आलेला महाद्वार प्रवेश पूर्ववत सुरू करून भाविकांना प्रवेश द्यावा, अशीही मागणी करण्यात आली.दुपारी चार वाजण्याच्या सुमारास नगराध्यक्ष विनोद गंगणे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन व्यापाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांच्या उपस्थितीत झालेल्या चर्चेनंतर व्यापाऱ्यांना दिलासा देणारा निर्णय जाहीर करण्यात आला. त्यामुळे आंदोलनावर पडदा पडला असून व्यापारी वर्गाने समाधान व्यक्त केले आहे. व्यापाऱ्याचा विषय मार्गी लावल्यानंतर यावेळी नगरसेवक तथा गटनेते औदुंबर कदम,नगरसेवक चंद्रशेखर भोसले,दिनेश शिरसागर,भाजपा तालुकाध्यक्ष आनंद कंदले,मनोज गवळी,सुनील रोचकरी तसेच पदाधिकारी मोठ्या संख्येने आधी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे