Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

जिल्हाधिकारी कीर्ती कुमार पूजार यांचे दुहेरी यश;नवरात्र उत्सवाचे दर्जेदार नियोजन आणि अतिवृष्टी व्यवस्थापनात प्रशासकीय कौशल्याची झलक!

जिल्हाधिकारी कीर्ती कुमार पूजार यांचे दुहेरी यश;नवरात्र उत्सवाचे दर्जेदार नियोजन आणि अतिवृष्टी व्यवस्थापनात प्रशासकीय कौशल्याची झलक!

0 6 7 8 4 1

जिल्हाधिकारी कीर्ती कुमार पूजार यांचे दुहेरी यश;नवरात्र उत्सवाचे दर्जेदार नियोजन आणि अतिवृष्टी व्यवस्थापनात प्रशासकीय कौशल्याची झलक!

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

शारदीय नवरात्र उत्सवाची सांगता झाल्यानंतर तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कीर्ती कुमार पूजार यांनी या उत्सवाचे उत्कृष्ट नियोजन करून राज्यभरातून कौतुक मिळवले आहे. यंदाच्या नवरात्रात लाखो भाविकांनी देवीदर्शनासाठी तुळजाभवानी मंदिरात गर्दी केली असताना, मंदिर परिसरातील वाहतूक, सुरक्षा, स्वच्छता, निवास व्यवस्था आणि भाविकांना दिल्या जाणाऱ्या सुविधांचा उत्तम ताळमेळ राखत जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण प्रशासन यंत्रणा कार्यरत ठेवली.

नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अतिवृष्टीमुळे धाराशिव जिल्ह्यात मोठे नुकसान झाले होते. पिकांचे नुकसान,रस्ते व पूल वाहून जाणे, तसेच नागरिकांना झालेल्या हालअपेष्टा या साऱ्या परिस्थितीत जिल्हाधिकारी पूजार यांनी तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणत बचाव, मदत आणि पुनर्वसनाचे काम तत्परतेने केले. अशा दुहेरी जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडत त्यांनी प्रशासकीय कार्यक्षमतेचा आदर्श घालून दिला आहे.

तुळजापूरनामा न्यूजचे संपादक ज्ञानेश्वर गवळी आणि उपसंपादक उमाकांत रामभाऊ पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांची विशेष भेट घेऊन या दोन्ही विषयांवर चर्चा केली. नवरात्र उत्सवाचे नियोजन आणि अतिवृष्टी व्यवस्थापन या दोन्ही क्षेत्रांतील त्यांच्या उत्कृष्ट नेतृत्वाचे कौतुक करत त्यांनी जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार यांना शुभेच्छा दिल्या.

या भेटीवेळी जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष श्रीकांत कदम तसेच तुळजापूरनामा न्यूज टीमचे सदस्य उपस्थित होते. जिल्हाधिकारी पूजार यांच्या संयमित, दुरदृष्टीपूर्ण आणि लोकहितैषी कार्यपद्धतीमुळे तुळजापूर तसेच संपूर्ण धाराशिव जिल्हा प्रशासनाकडे आज राज्यभरातून कौतुकाने पाहिले जात आहे. भविष्यातही त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा विकासाच्या वाटचालीत नवे मापदंड निर्माण होणार, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

4.7/5 - (3 votes)

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 7 8 4 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे