Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

स्वच्छ प्रतिमेचा विजय; काक्रंबा गटात ॲड रामचंद्र ढवळेंची मशाल उजळली;१६ गावांत एकच चर्चा – बदल हवा, मशाल हवी!

0 6 7 8 4 1

स्वच्छ प्रतिमेचा विजय; काक्रंबा गटात ॲड रामचंद्र ढवळेंची मशाल उजळली;१६ गावांत एकच चर्चा – बदल हवा, मशाल हवी!

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

काक्रंबा जिल्हा परिषद गटात यंदाच्या निवडणुकीत राजकीय चित्र पूर्णपणे बदलले असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या मशाल चिन्हाने संपूर्ण गटात जोरदार तडाखा दिला आहे. भाजपच्या अंतर्गत वाद, गटबाजी आणि चुकीच्या निर्णयांमुळे कमळाची मुळे उखडली जात असताना, जनतेच्या विश्वासावर उभ्या असलेल्या ॲड. रामचंद्र दौलतराव ढवळे ( चिन्ह मशाल) यांनी निर्णायक आघाडी घेतली आहे.भाजपने ऐनवेळी निष्ठावंत व लोकप्रिय उमेदवाराला डावलून दिलेल्या तिकीटामुळे पक्षात तीव्र असंतोष उफाळून आला. नाराज कार्यकर्ते, पदाधिकारी आणि समर्थक आता उघडपणे भाजपपासून दूर जात असून, “जनतेचा उमेदवार” म्हणून ओळख निर्माण केलेल्या ॲड रामचंद्र ढवळेंकडे वळताना दिसत आहेत. अपक्ष अर्ज मागे घेतले गेले असले तरी त्यांचा संपूर्ण पाठिंबा मशालीकडे वळल्याने भाजपची ताकद अक्षरशः खिळखिळी झाली आहे.या पार्श्वभूमीवर ॲड. रामचंद्र ढवळे यांनी संयमी पण आक्रमक रणनीतीने प्रचाराची धग पेटवली असून, १६ गावात २३७०० मतदान असून गावोगावी मशालीच्या प्रचाराला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. प्रत्येक गावात कार्यकर्त्यांचा उत्साह, लोकांचा सहभाग आणि जनतेतून उमटणारा विश्वास पाहता, काक्रंबा गटात बदलाची लाट स्पष्टपणे दिसत आहे.
या निवडणुकीत अमोल किसन झोंबाडे ( चिन्ह हात), दयानंद मनोहर शिंदे ( चिन्ह कमळ), मिलिंद (दादा) सोमनाथ रोकडे ( चिन्ह गॅस सिलेंडर) आणि बाळासाहेब दौलतराव ढवळे ( चिन्ह शिट्टी आहे) असे उमेदवार रिंगणात असले तरी संपूर्ण चर्चेच्या केंद्रस्थानी फक्त एकच नाव आहे.मशाल आणि ॲड. रामचंद्र ढवळे.एकीकडे भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप, नाराजी आणि अंतर्गत संघर्ष सुरू असताना, दुसरीकडे मशालीने जनतेच्या प्रश्नांवर आधारित प्रचार, स्वच्छ प्रतिमा आणि मजबूत संघटनात्मक ताकदीच्या जोरावर विजयाच्या दिशेने दमदार वाटचाल सुरू केली आहे. त्यामुळे आता काक्रंबा गटात एकच ठाम चर्चा आहे.ही निवडणूक नाही, तर बदलाची लढाई आहे… आणि त्या बदलाचं नाव आहे ‘मशाल’!

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 7 8 4 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे