Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

सांजा येथे घरफोडी; ४० हजारांचा ऐवज लंपास;आरोपी पोलिसांच्या ताब्यात

सांजा येथे घरफोडी; ४० हजारांचा ऐवज लंपास;आरोपी पोलिसांच्या ताब्यात

0 6 7 8 4 1

सांजा येथे घरफोडी; ४० हजारांचा ऐवज लंपास;आरोपी पोलिसांच्या ताब्यात

धाराशिव : ज्ञानेश्वर गवळी

आनंदनगर पोलिस ठाणे हद्दीतील सांजा येथे घरफोडीची घटना घडली असून पोलिसांनी तत्पर कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.

फिर्यादी मुबारक दगडुसाहेब सय्यद (वय ६७, रा. सांजा, ता. धाराशिव) यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक ६ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास आरोपी विष्णु विश्वास सुर्यवंशी (वय १९, रा. सांजा) याने त्यांच्या घरात घुसून कपाटातील अंदाजे ४० हजार रुपयांची रोकड चोरी केली.

फिर्यादीच्या तक्रारीवरून आनंदनगर पोलिस ठाण्यात भारतीय दंड विधान कलमा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासादरम्यान आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पुढील तपास आनंदनगर पोलिस करत आहेत.

5/5 - (1 vote)

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 7 8 4 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे