Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

उपविभागीय कार्यालयात जाण्याचा राग — वृद्ध दाम्पत्यावर मारहाण राळेसांगवीत घटनेनंतर पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

0 7 6 4 8 7

उपविभागीय कार्यालयात जाण्याचा राग — वृद्ध दाम्पत्यावर मारहाण राळेसांगवीत घटनेनंतर पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

भुम – प्रतिनिधी

राळेसांगवी (ता. भुम) येथे किरकोळ कारणावरून वृद्ध दाम्पत्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी भुम पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी मारुती लक्ष्मण वाघ (वय 61, रा. राळेसांगवी) हे दि. 11 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास आपल्या गावात असताना, आरोपी विजय शेषेराव वाघ, रामभाऊ भास्कर वाघ, हनुमंत नागुराव वाघ, सुरज ज्ञानोबा वाघ आणि वासुदेव अर्जुन टाळके (सर्व रा. राळेसांगवी) यांनी “तु उपविभागीय कार्यालय, भुम येथे का गेला होतास?” या कारणावरून त्यांना व त्यांच्या पत्नीला शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच “जिवे ठार मारू” अशी धमकीही दिली.

या घटनेनंतर मारुती वाघ यांनी दुसऱ्या दिवशी म्हणजेच दि. 12 ऑक्टोबर रोजी भुम पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी भा.दं.वि. कलम 189(2), 191(2), 190, 115(2), 352, 351(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास भुम पोलिस करत आहेत.

2.8/5 - (5 votes)

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे