Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

बसस्थानकात सोन्याचे दागिने लंपास गर्दीचा फायदा घेत अज्ञाताकडून १.५६ लाखांचा ऐवज चोरी तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

प्रवाशांच्या सुरक्षेला प्रश्नचिन्ह! बसस्थानकात १.५६ लाखांची धडधडीत चोरी

0 7 6 4 8 7

बसस्थानकात सोन्याचे दागिने लंपास गर्दीचा फायदा घेत अज्ञाताकडून १.५६ लाखांचा ऐवज चोरी
तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

तुळजापूर | प्रतिनिधी

शहरातील जुने बसस्थानक परिसरात प्रवाशांची गर्दी आणि असावधानतेचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने प्रवाशाच्या पर्समधील सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुकुमार अंतलेश्वर सुरवसे (वय ४०, रा. बालाजी नगर, धाराशिव) हे दि. १८ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४.१५ वाजण्याच्या सुमारास तुळजापूर येथील जुने बसस्थानक येथे बसमधून उतरत असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने त्यांच्या पर्समधील ३९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, अंदाजे १ लाख ५६ हजार रुपये किमतीचे, चोरून नेले.या घटनेची फिर्याद दि. २३ डिसेंबर २०२५ रोजी तुळजापूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास तुळजापूर पोलिसांकडून सुरू आहे.बसस्थानकासारख्या गर्दीच्या ठिकाणी वारंवार अशा घटना घडत असल्याने प्रवाशांनी अधिक सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे