Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

नगराध्यक्षपदाच्या पार्श्वभूमीवर प्रिया गंगणे यांचे प्रभावी आगमन महिलांचा व नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नवीन पिढीचा आत्मविश्वास — नवशिक्षित मतदारांची उमेद! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नजरेत झळकली कु. प्रिया विनोद गंगणे यांची प्रभावी झलक

0 7 6 4 8 7

नवीन पिढीचा आत्मविश्वास — नवशिक्षित मतदारांची उमेद!

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नजरेत झळकली कु.प्रिया विनोद गंगणे यांची प्रभावी झलक

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

“नवीन पिढी,नवीन विचार आणि नव्या उत्साहातून शहराचा विकास घडविण्याची जबाबदारी आता नवशिक्षित मतदारांची आहे,” असा ठाम संदेश देत कु. प्रिया विनोद गंगणे यांनी दिवाळीच्या पवित्र सणात आपल्या भाषणातून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

दि. १८ ऑक्टोबर रोजी तुळजापूर शहरात आयोजित ‘५००० दिवाळी शिधा किट वाटप कार्यक्रमात’ कु. प्रिया गंगणे यांनी आपल्या प्रभावी, आत्मीयतेने भरलेल्या भाषणातून उपस्थित नागरिक, महिला व युवक वर्गाला थक्क केले.

व्यासपीठावर उभ्या राहून प्रिया यांनी वडील विनोद पिटू गंगणे यांच्याबद्दलच्या प्रेमभावनेने ओथंबलेल्या शब्दांत कृतज्ञता व्यक्त केली. शहरातील महिलांप्रती विशेष आपुलकी दाखवत त्यांनी म्हटले —

◾“विरोधक बदनामी करत असले तरी आपण विकासाची दिशा ठरवली आहे. तिर्थक्षेत्र तुळजापूरचा कायापालट घडविण्याचे कार्य माझे वडील निश्चितच पूर्ण करतील” या कार्यक्रमात तालुक्याचे विद्यमान आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांनी कार्यक्रमास उशिरा उपस्थित दर्शवली

या कार्यक्रमास नागरिकांनी, विशेषतः महिलांनी, विनोद गंगणे यांच्या कार्यशैलीबद्दल उत्स्फूर्त प्रतिसाद देत भरभरून पाठिंबा दर्शविला. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भाषणाने शहरातील वातावरणात नवीन ऊर्जा निर्माण केली आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष सौ. अर्चनाताई गंगणे होत्या. यावेळी सौ. संगीताताई कदम, प्रियांकाताई गंगणे, पूजाताई गंगणे, सचिन रोचकरी, विजय गंगणे, शांताराम पेंदे, विशाल रोचकरी, पंडित जगदाळे, नागेश नाईक, राजेश्वर कदम, औदुंबर कदम, उपसभापती सुहास गायकवाड, अमर हंगरगेकर, अप्पा कदम, सागर पारडे, शिवनाथ भांजी, किशोर गंगणे, रत्नदीप भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

 

शहरातील नागरीकांच्या गर्दीने कार्यक्रमाला उत्सवी रंग चढवला. प्रिया गंगणे यांच्या वक्तृत्वातून नवीन पिढीचा आत्मविश्वास झळकला, तर त्यांच्या भाषणाने तुळजापूरच्या राजकीय वातावरणात नव्या उमेदेची चाहूल लागली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे