Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

तुळजापूर : बायपासवर तीन अज्ञातांचा धुमाकूळ; पथकाच्या तत्परतेने तपासाला गती

तुळजापूर : बायपासवर तीन अज्ञातांचा धुमाकूळ; पथकाच्या तत्परतेने तपासाला गती

0 7 6 4 8 6

तुळजापूर : बायपासवर तीन अज्ञातांचा धुमाकूळ; पथकाच्या तत्परतेने तपासाला गती

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

शहरातील बायपास रोडवर पुन्हा एकदा अज्ञात टोळीकडून लुटमारीची घटना घडून परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तुळजापूर तालुक्यातील केमवाडी येथील माउली महादेव ताटे (वय 34) आणि त्यांचे साथीदार दि. 09 डिसेंबर रोजी सिंदफळ फाटा ते लातुर मार्गाने जात असताना तीन अज्ञात इसमांनी त्यांना रस्त्याच्या कडेला थांबवून लुट केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

फिर्यादी ताटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अचानक समोर आलेल्या तिघांनी दबाव टाकत त्यांच्याकडील सोन्या–चांदीचे दागिने आणि तब्बल ३५ हजार रुपये रोख, असा एकूण ५० हजार रुपयांचा ऐवज हिसकावून पलायन केले.

या प्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक विजय थोटे हे करीत आहेत यांच्या तपासाला वेग आला आहे. घटनेनंतर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, संशयितांचे हालचाली आणि संभाव्य रूट यांचा तपशीलवार शोध घेण्यात येत असल्याची माहिती मिळते.

पोलीस उपनिरीक्षक विजय थोटे यांनी सांगितले की, “घटना गंभीर आहे. संबंधित आरोपींचा माग काढण्यासाठी विशेष पथक कामाला लागले असून काही महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे.”

या प्रकरणामुळे तुळजापूर बायपास परिसरातील सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, नागरिकांनी रात्रीच्या वेळी सावधानतेचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे