ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय
महाएक्झिट पोलचा राजकीय भूकंप! भाजपाचा झेंडा १४० हून अधिक नगरपरिषदांवर ? उद्धवसेना-पवार गटाला मोठा हादरा

0
6
7
8
4
1

▶ तुळजापूर : तुळपापूरनामा न्यूज नेटवर्क
राज्यातील २४६ नगरपरिषद आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल आज,दि. २१ डिसेंबर २०२५ रोजी जाहीर होत असतानाच, महाएक्झिट पोलने राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे.कोणाचा बालेकिल्ला ढासळणार? कोणाच्या गळ्यात विजयाचा गुलाल पडणार? या साऱ्या प्रश्नांची उत्तरं निकालातून मिळणार असली,तरी जेडीएस आणि झी २४ मराठी यांनी सादर केलेल्या महाएक्झिट पोलने आधीच चित्र स्पष्ट केल्याचे दिसते.या एक्झिट पोलनुसार, भाजपाला राज्यात सर्वाधिक १४० ते १५२ नगरपरिषद व नगरपंचायतींमध्ये सत्ता मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.भाजपाच्या या दमदार कामगिरीमुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कमळाची पकड अधिक घट्ट होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.भाजपानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ३४ ते ४२, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला २४ ते ३६ नगरपरिषदांमध्ये यश मिळेल, असा अंदाज आहे. दुसरीकडे काँग्रेसला २५ ते ३५ नगरपरिषदांमध्ये सत्ता मिळू शकते, असे भाकीत करण्यात आले आहे.मात्र, या महाएक्झिट पोलमध्ये सर्वात मोठा धक्का बसल्याचे चित्र उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससाठी असल्याचे दिसत आहे. दोन्ही पक्षांना अपेक्षेपेक्षा कमी यश मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आल्याने राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.उद्धवसेनेचे पानिपत, पवारांनाही जबर धक्का ! आजच्या निकालातून महाएक्झिट पोल कितपत खरा ठरतो, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

0
6
7
8
4
1




