Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

प्रताप सरनाईकांची दिवाळी भेट! नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १०१ दुभती गोधन — उपजीविकेला नवा आधार..

अतिवृष्टीच्या पावसाने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी पालकमंत्र्यांचा आगळावेगळा उपक्रम !

0 7 6 5 0 7

प्रताप सरनाईकांची दिवाळी भेट! नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १०१ दुभती गोधन — उपजीविकेला नवा आधार..

अतिवृष्टीच्या पावसाने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी पालकमंत्र्यांचा आगळावेगळा उपक्रम !

धाराशिव : ज्ञानेश्वर गवळी

अवकाळी पावसाने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या हाती नवचैतन्याची ज्योत देणारा उपक्रम — पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या वतीने राबविण्यात आला आहे.
अवकाळी पावसात वाहून गेलेल्या अथवा मृत पावलेल्या दुभत्या जनावरांमुळे उपजीविकेचा कणा मोडलेल्या शेतकऱ्यांना १०१ दुभती गोवंश जनावरे दिवाळी भेट म्हणून दिली जाणार आहेत.या अनोख्या उपक्रमाचा शुभारंभ नरक चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला.

“शेतकऱ्यांचा संसार पुन्हा बहरावा, हीच खरी दिवाळी भेट” — प्रताप सरनाईक

दरवर्षी दिवाळीनिमित्त सरनाईक कुटुंबाकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विशेष भेट दिली जाते. मात्र यंदा ही भेट अधिक अर्थपूर्ण ठरली आहे.पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपविलेल्या आपल्या नेतृत्वाला आदरांजली म्हणून, धाराशिव जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दुभती जनावरे भेट देण्याचा निर्णय सरनाईक यांनी घेतला.

◾“अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचा संसार उद्ध्वस्त झाला. पिकं, भांडीकुंडी, संसारातील वस्तूंसह उपजीविकेचा आधार असलेली जनावरंही वाहून गेली. अशा वेळी आम्ही त्यांना दुधाळ गोवंश भेट देत आहोत. त्यांच्या संसाराला पुन्हा नवचैतन्य लाभावे, हीच आमची खरी दिवाळी भेट आहे,”
— असे प्रताप सरनाईक म्हणाले.

शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणारे पत्र आणि प्रेरक संकल्पना

धाराशिव जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार प्रा. सतीश मापने यांनी अवकाळी पावसात जनावरं गमावलेल्या शेतकऱ्यांची व्यथा मांडणारे पत्र पालकमंत्री सरनाईक यांना लिहिले.
या पत्रातून प्रेरणा घेत सरनाईक यांनी “शेतकऱ्यांचा संसार पुन्हा उभा करण्याचा संकल्प” केला आणि त्याचे रूपांतर १०१ दुभती जनावरांच्या दिवाळी भेटीत झाले.

◾“शेतकऱ्याला उभं करणं म्हणजे आपल्या भूमीचं पुनर्जन्म घडवणं”शेतकऱ्यांचा संसार केवळ सरकारी मदतीवर उभा राहू शकत नाही, हे अधोरेखित करत सरनाईक म्हणाले,

◾“आपण सर्वांनी समाजभावनेतून पुढे येऊन शेतकऱ्यांना हात द्यायला हवा. कारण शेतकऱ्याला उभं करणं म्हणजे आपल्या भूमीचं, आपल्या अन्नदात्याचं पुनर्जन्म घडवणं आहे.”

◾‘गोधन भेट’ उपक्रमामुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबांच्या घरात पुन्हा आशेचा दिवा पेटला आहे — आणि हीच खरी दिवाळी उजळण ठरली आहे!

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 5 0 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे