ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय
धाराशिव जिल्ह्यात महायुती नसल्याचे राष्ट्रवादी (अजित पवार गट)चे स्पष्टीकरण; तिन्ही नगरपालिकांत स्वतंत्र लढतीचा निर्धार !
धाराशिव जिल्ह्यात महायुती नसल्याचे राष्ट्रवादी (अजित पवार गट)चे स्पष्टीकरण; तिन्ही नगरपालिकांत स्वतंत्र लढतीचा निर्धार !
0
7
6
4
8
6
धाराशिव जिल्ह्यात महायुती नसल्याचे राष्ट्रवादी (अजित पवार गट)चे स्पष्टीकरण; तिन्ही नगरपालिकांत स्वतंत्र लढतीचा निर्धार !

धाराशिव : ज्ञानेश्वर गवळी
धाराशिव जिल्ह्यात महायुती झाल्याचा खोटा समज पसरवून मतदारांची दिशाभूल केली जात असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट)ने केला आहे. “धाराशिव, तुळजापूर आणि नळदुर्ग नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्वतंत्र लढत आहे. महायुती असल्याची अफवा पसरवून मतदारांची दिशाभूल करण्याचा विरोधकांचा प्रयत्न तात्काळ थांबवावा,” असे आवाहन जिल्हाध्यक्ष महेंद्र (काका) भानुदासराव धुरगुडे यांनी स्पष्ट शब्दांत केले.

धाराशिव नगरपालिका, तुळजापूर आणि नळदुर्ग या तिन्ही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांच्या उपस्थितीत उमेदवारांच्या नावांची औपचारिक सूचना प्रदेशाध्यक्ष मा. खा. सुनिल तटकरे यांना पाठवण्यात आली. संबंधित नगरपालिकांसाठी जाहीर उमेदवार यादीत नगराध्यक्ष पदापासून सर्व प्रभागांतील उमेदवारांचा समावेश असून पक्षाने काटेकोर पडताळणी करून उमेदवारांची निवड केली असल्याचे सांगण्यात आले.
धाराशिव नगरपालिका क्षेत्रात ॲड मंजुषा साखरे नगराध्यक्ष , अतुल आदमाने, मंगल चांदणे, सुहेब पठाण, सौरभ देशमुख, ऋतुजा भोसले, किशोर किरदत्त, शबाना शेख, नेहा बनसोडे, मैनोद्दीन पठाण, जमीर मुल्ला, फरजाना माशायक, सना शेख, जमील सय्यद, आशा वगरे यांसह अपक्ष पुरस्कृत उमेदवार घोषीत करण्यात आलेले आहेत.
तुळजापूर आणि कळंब येथील उमेदवारांची देखील सविस्तर नावे जाहीर करण्यात आले आहेत. प्रभागांत चिन्हावर स्पर्धा करणारे उमेदवार देखील पक्षाने पाठिंबा दिलेले असल्याचे पत्रात नमूद आहे. नळदुर्ग नगरपालिकेसाठी नगराध्यक्षपदी संजय बताले यांसह २५ प्रभागातील उमेदवारांची यादी पक्षाने अधिकृतपणे प्रसिद्ध केली आहे.
जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे म्हणाले, “धाराशिव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने कुठेही महायुती केलेली नाही. विरोधक जाणीवपूर्वक महायुती असल्याची अफवा पसरवून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत. मतदारांनी अशा भ्रमित करणाऱ्या प्रचाराला बळी पडू नये. आमचे सर्व उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार असून आम्ही तिन्ही नगरपालिकांत ताकदीने स्वतंत्र लढत आहोत.”
तिन्ही नगरपालिकांतील मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत उमेदवारांना विश्वासाने मतदान करावे, असे आवाहन धुरगुडे आणि तुळजापूर तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण सूर्यवंशी यांनी केले.

तुळजापूर नगरपरिषद निवडणूक : राष्ट्रवादीकडून तीन अपक्ष उमेदवारांना पाठिंबा

तुळजापूर आगामी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने तीन प्रभागांमध्ये अपक्ष उमेदवारांना अधिकृत पाठिंबा जाहीर केला आहे. जिल्हाध्यक्ष महेंद्र (काका) धुरगुडे यांनी दिलेल्या पत्रानुसार प्रभाग २ (अ) मधील शुभम कमलचंद कदम, प्रभाग ५ (अ) मधील ममता नंदू कांबळे व प्रभाग ११ (क) मधील दत्ताभाऊ सुदाम कांबळे यांना पुरस्कृत उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आले आहे. पक्षाच्या या निर्णयामुळे स्थानिक पातळीवरील निवडणूक समीकरणांना वेगळी दिशा मिळण्याची चिन्हे दिसत आहेत.

0
7
6
4
8
6



