Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

इदगा भागातील रस्ता बंद; रहिवाशांचा संताप, पालिकेला आंदोलनाचा इशारा 

इदगा भागातील रस्ता बंद; रहिवाशांचा संताप, पालिकेला आंदोलनाचा इशारा 

0 6 7 8 4 1

इदगा भागातील रस्ता बंद; रहिवाशांचा संताप, पालिकेला आंदोलनाचा इशारा

तुळजापूर : प्रतिनिधी

तुळजापूर शहरातील
वेताळ नगर इदगा भागातील शेकडो रहिवाशांना इदगा परिसरातून जाणारा जुना रस्ता कायमस्वरूपी खुला करून देण्याची मागणी जोर धरत आहे. रहिवाशांच्या वतीने नगर परिषद मुख्याधिकारी यांना दि.१३ ऑक्टोंबर रोजी निवेदन देण्यात आले असून, तातडीने तो रस्ता खुला न केल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

रहिवाशांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, इदगा उत्तर बाजूस राहणाऱ्या नागरिकांना चारचाकी वाहने येण्यासाठी कोणताही मार्ग उपलब्ध नाही. त्यामुळे वृद्ध, आजारी तसेच महिलांना अत्यंत हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. अग्निशमन यंत्रणा, रुग्णवाहिका वा इतर आपत्कालीन सेवा रस्ता नसल्याने त्या भागात पोहोचू शकत नाहीत. त्यामुळे जीवितहानीची शक्यता कायम आहे.

सदर भागातील नागरिकांना मयत व्यक्तीला स्मशानभूमीत नेण्यासाठी अवघे ५०० मीटर अंतर असूनही, रस्ता बंद झाल्याने तब्बल २ ते ३ किलोमीटर वळसा घ्यावा लागत आहे. गेल्या ५० ते ६० वर्षांपासून इदगा मैदानातून घाटशिळन रोडकडे जाणारा अंदाजे २० ते ५० फुटांचा रस्ता खुला होता. परंतु अलीकडेच काही राजकीय दबावाखाली त्या ठिकाणी २०० ते २५० फुटांची भिंत बांधण्यात आली असून रस्ता अडविण्यात आला आहे.

तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सुरू असलेल्या अनेक घरकुल बांधकामांना सध्या साहित्य वाहतुकीची अडचण निर्माण झाली आहे. रहिवाशांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, जर रस्ता तातडीने खुला करून दिला नाही तर येथील बांधकामे थांबवून आंदोलनाचा मार्ग अवलंबला जाईल.

या निवेदनावर सुनिल घाडगे, प्रकाश पुणेकर, विक्रम सावंत यांसह इदगा भागातील अनेक नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

“इदगा भागातील रस्ता पुन्हा खुला करून द्यावा,अन्यथा आंदोलन अटळ,”रहिवाशांचा नगर परिषदला एका निवेदनाद्वारे इशारा देण्यात आला आहे.

3/5 - (1 vote)

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 7 8 4 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे