ब्रेकिंगमहाराष्ट्र
बिल थकले की कनेक्शन कट; आकडेबहादर मात्र मोकाट! – आपसिंग्यात महावितरणच्या कारभारावर संताप
बिल थकले की कनेक्शन कट; आकडेबहादर मात्र मोकाट! – आपसिंग्यात महावितरणच्या कारभारावर संताप

0
7
6
4
8
6
बिल थकले की कनेक्शन कट; आकडेबहादर मात्र मोकाट! – आपसिंग्यात महावितरणच्या कारभारावर संताप
तुळजापूर : तुळजापूर तालुक्यातील अपसिंगा येथील नियमित वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांना अंधारात ठेवून वीज चोरी करणाऱ्यांना मोकळीक देण्याचा अजब कारभार महावितरण कडून सुरू असल्याचा आरोप तुळजापूर तालुक्यातील अपसिंगा परिसरात होत आहे. डिजिटल मीटर बसवल्यानंतर केवळ एक महिन्याचे बिल थकल्यास तत्काळ वीजपुरवठा खंडित केला जातो; मात्र बेकायदेशीर वीज वापरणाऱ्यांवर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. आपसिंगा, कामठा, कात्री, ढेकरी आदी गावांमध्ये वीज चोरीचे प्रमाण वाढल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.“प्रामाणिकपणे बिल भरणाऱ्यांनाच शिक्षा आणि आकडेबहादरांना मोकळीक अशी भावना ग्राहकांमध्ये निर्माण झाली आहे. यामुळे वारंवार होणाऱ्या वीज खंडिततेचा फटका प्रामाणिक ग्राहकांनाच बसत असून दैनंदिन जीवन विस्कळीत होत आहे.
लाईनमन नसल्याने कारभार रामभरोसे आपसिंगा हे सुमारे साडेसात हजार लोकसंख्येचे गाव असून पूर्वी येथे दोन लाईनमन कार्यरत होते. मात्र गेल्या दोन वर्षांपासून एकही अधिकृत लाईनमन उपलब्ध नसून केवळ झिरो लाईनमनवर संपूर्ण कारभार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे बिघाड दुरुस्ती, देखभाल आणि वीज चोरीविरोधातील कारवाई पूर्णपणे ठप्प झाल्याचे चित्र आहे.कारवाईचा अभाव; संशयाला उधाण वीज चोरी रोखण्यासाठी छापे टाकले जात नसल्याने “चोरावर मोर” अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. काही कर्मचाऱ्यांचे व आकडेबहादरांचे लागेबांधे तर नाहीत ना, असा संशयही नागरिक व्यक्त करीत आहेत.
नागरिकांचा इशारा या पार्श्वभूमीवर प्रामाणिक ग्राहकांना न्याय देत वीज चोरीवर कठोर कारवाई करावी, तसेच तातडीने लाईनमन नेमावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
0
7
6
4
8
6



