Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

बावी (का) परिसरात अवैध दारूचा धंदा तेजीत; दारूबंदी विभाग झोपेत, कारवाई मात्र ग्रामीण पोलिसांची !

बावी (का) परिसरात अवैध दारूचा धंदा तेजीत; दारूबंदी विभाग झोपेत, कारवाई मात्र ग्रामीण पोलिसांची !

0 7 6 4 8 6

बावी (का) परिसरात अवैध दारूचा धंदा तेजीत; दारूबंदी विभाग झोपेत, कारवाई मात्र ग्रामीण पोलिसांची !

धाराशिव : राज्यभर अन्न व औषध प्रशासन विभागाकडून हॉटेल, पानटपऱ्या आणि खाद्यपदार्थ विक्री केंद्रांवर धडाकेबाज छापेमारी सुरू असताना, धाराशिव तालुक्यातील बावी (का.) परिसरात मात्र अवैध दारू विक्रीचा व्यवसाय बिनधास्तपणे सुरू असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, दारूबंदी विभागाकडून ठोस कारवाई होत नसल्याने त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

अशा परिस्थितीत कारवाईची जबाबदारी ग्रामीण पोलिसांवर येत असल्याचे चित्र दिसत आहे.धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने दि. ११ जून २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६.२० वाजण्याच्या सुमारास बावी (का) परिसरातील एन एच-५२ महामार्गालगत असलेल्या सुमाई हॉटेलवरछापा टाकला. या कारवाईत तानाजी वसंतराव जटार (वय ५३, रा. गणेश नगर, धाराशिव) याच्या ताब्यातून अवैध विक्रीसाठी ठेवलेल्या अंदाजे ४ हजार ६०० रुपयांच्या देशी-विदेशी दारूच्या सिलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या.या प्रकरणी आरोपीविरुद्ध महाराष्ट्र मद्यनिषेध कायदा कलम ६५ (ई) अन्वये धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, बावी, कावलदरा परिसरात अवैध दारू विक्रीचे जाळे वाढत असल्याच्या तक्रारी सातत्याने होत असतानाही दारूबंदी विभागाकडून प्रभावी कारवाई होत नसल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे. “दारूबंदी कार्यालय केवळ नावालाच आहे का?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात असून, संबंधित विभागाने केवळ कागदी घोडे नाचविण्याऐवजी प्रत्यक्ष मैदानात उतरून अवैध मद्यविक्रीविरोधात कठोर मोहीम राबवावी,अशी मागणी होत आहे.
ग्रामीण पोलिसांच्या कारवाईमुळे अवैध धंद्याचा पर्दाफाश झाला असला, तरी दारूबंदी विभागाची निष्क्रियता पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. आता वरिष्ठ अधिकारी या प्रकाराची दखल घेऊन संबंधितांवर जबाबदारी निश्चित करणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे