Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

तुळजापुर विकास प्राधिकरण अंतर्गत रस्ताकरणाची मागणी हुतात्मा स्मारक–आर्य चौक–किसान चौक मार्गासाठी भूसंपादन तातडीने करा

0 6 7 8 4 1

तुळजापुर विकास प्राधिकरण अंतर्गत रस्ताकरणाची मागणी हुतात्मा स्मारक–आर्य चौक–किसान चौक मार्गासाठी भूसंपादन तातडीने करा

तुळजापूर | प्रतिनिधी

तुळजापूर विकास प्राधिकरण योजनेअंतर्गत हुतात्मा स्मारक ते आर्य चौक ते किसान चौक या महत्त्वपूर्ण मार्गाच्या रस्ता रुंदीकरण करणासाठी विहीत प्रक्रियेनुसार भूसंपादनाची तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, धाराशिव यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.सहायक संचालक, नगररचना, धाराशिव यांनी याबाबत दिलेल्या पत्राच्या अनुषंगाने रस्ता रुंदीकरणाची प्रक्रिया पुढे नेण्यात यावी. सदर मार्ग अत्यंत वर्दळीचा असून नागरिकांसह भाविकांची मोठ्या प्रमाणावर ये-जा होत असते. मात्र रस्त्याची अरुंदता व अपुरी सुविधा यामुळे वारंवार वाहतूक कोंडी होत असून अपघाताचीही शक्यता निर्माण होत आहे.त्यामुळे भूसंपादनाची कार्यवाही पूर्ण करून रस्त्याच्या कामास तात्काळ सुरुवात करावी, जेणेकरून नागरिकांची व भाविकांची गैरसोय टाळता येईल, असे निवेदनात करण्यात आली आहे.या निवेदनावर नगरसेवक अमोल माधवराव कुतवळ, आनंद नानासाहेब जगताप, अक्षय धनंजय कदम, सौ. प्रगती गोपाळ लोंढे व रणजीत चंद्रकांत इंगळे यांच्या स्वाक्षऱ्या असून नगरपरिषद प्रशासनाने याबाबत त्वरित सकारात्मक कार्यवाही करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 7 8 4 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे