Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

दिवसा व्यावसायिकाला लुटणारा दुसरा आरोपी जेरबंद;तुळजापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

तुळजापूर पोलिसांची दमदार कामगीरी

0 6 7 8 4 1

दिवसा व्यावसायिकाला लुटणारा दुसरा आरोपी जेरबंद;तुळजापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

तुळजापूरच्या घाटात व्यावसायिकावर झालेल्या भरदिवसातील लुटप्रकरणातील दुसरा आरोपीही अखेर ताब्यात आला असून स्थानिक पोलिसांनी केलेल्या धडाकेबाज कारवाईची सर्वत्र प्रशंसा होते आहे.दि.२५/१०/२०२५ रोजी झालेल्या प्रकरणातील दोन आरोपींपैकी एकाला यापूर्वीच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले होते, तर दुसरा आरोपी दि.६ नोव्हेंबर रोजी तुळजापूर पोलिसांनी वेताळ नगर परिसरातून सापळा रचून जेरबंद केले.

गुन्ह्याबाबत मिळालेल्या गुप्त माहितीनुसार-वेताळ नगर येथील मनोज उर्फ पापा महादेव धोत्रे (वय ३०) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने काही दिवसांपूर्वी अटक केली होती. चौकशीत त्याने आपल्या साथीदारासह दिवसा घाटात व्यावसायिकाला लुट केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून गुन्ह्यातील रेडमी कंपनीचा मोबाईल फोनही जप्त करण्यात आला. त्यानंतर पुढील तपासासाठी त्याला तुळजापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते.

दरम्यान, या लुटप्रकरणातील दुसरा सराईत आरोपी राजा बब्रु भोसले (वय २६, रा. वेताळ नगर तुळजापूर) हा स्मशानभूमी परिसरात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तुळजापूर पोलिसांनी तत्काळ पथक तयार करून सापळा रचला आणि आरोपीला अटक करण्यात यश मिळवले.

ही कारवाई पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश देशमुख आणि पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पथकात पोलीस उपनिरीक्षक विजय थोटे, हवालदार संतोष करवार,हवालदार किरण आवताडे, पोलिस अमलदार शिवाजी शिरसाट,पोलिस अमलदार अरुण शिरगिरे यांनी कामगीरी केली.

दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्या मार्फत इतर गुन्ह्यांची उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तातडीने आणि प्रभावी कारवाई केल्याबद्दल नागरिकांतून तुळजापूर पोलिसांचे कौतुक होत असून प्रकरणाचा पुढील तपास हवालदार संतोष करवार करीत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 7 8 4 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे