Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

तुळजापूरमध्ये काँग्रेसचा प्रचार शिगेला; सपकाळांनी घेतले तुळजाभवानी मातेचे दर्शन

तुळजापूरमध्ये काँग्रेसचा प्रचार शिगेला; सपकाळांनी घेतले तुळजाभवानी मातेचे दर्शन

0 6 7 8 4 1

तुळजापूरमध्ये काँग्रेसचा प्रचार शिगेला; सपकाळांनी घेतले तुळजाभवानी मातेचे दर्शन

तुळजापूर | प्रतिनिधी

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचे शुक्रवार, दिनांक ३० जानेवारी रोजी तुळजापूर तालुक्यातील काडगाव जिल्हा परिषद गटात काँग्रेस पक्षाच्या प्रचाराला चांगलाच जोर आला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे प्रचार सभेला संबोधित करण्यासाठी तुळजापूरमध्ये दाखल झाले होते. सभेपूर्वी त्यांनी शक्तीपीठ तुळजाभवानी मंदिर येथे जाऊन आई तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले व राज्यात परिवर्तनासाठी शक्तीची प्रार्थना केली.दर्शनानंतर झालेल्या प्रचार सभेत बोलताना सपकाळ यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर परखड शब्दांत भाष्य केले. जिल्हा परिषद व पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थाच सामान्य जनतेच्या विकासाची खरी पायाभरणी करतात. काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरलेला आहे,असे ते म्हणाले. भाजप व सत्ताधारी गटांवर टीका करत त्यांनी विकास, शेतकरी, युवक व महिलांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले.यावेळी धाराशिव जिल्हा काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष ॲड धीरज पाटील, महाराष्ट्र काँग्रेस पार्टीचे सचिव अमर खानापुरे तसेच न.प. गटनेते तथा नगरसेवक अमोल कुतवळ आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून काडगाव गटात काँग्रेसचा प्रचार अधिक गती घेत असल्याचे चित्र दिसून आले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 7 8 4 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे