Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

लक्ष्मण आबा सूर्यवंशी यांची आयडियल पत्रकार संघटनेच्या राष्ट्रीय संयोजकपदी नियुक्ती

लक्ष्मण आबा सूर्यवंशी यांची आयडियल पत्रकार संघटनेच्या राष्ट्रीय संयोजकपदी नियुक्ती

0 7 6 4 9 7

लक्ष्मण आबा सूर्यवंशी यांची आयडियल पत्रकार संघटनेच्या राष्ट्रीय संयोजकपदी नियुक्ती

सोलापूर । संजय निंबाळकर : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मण आबा सूर्यवंशी यांची देशव्यापी आयडियल पत्रकार संघटनेच्या राष्ट्रीय संयोजकपदी निवड करण्यात आली आहे. नुकत्याच दिल्ली येथे झालेल्या संघटनेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सध्या ते राष्ट्रीय संपर्क प्रमुख म्हणून कार्यरत होते. संघटनात्मक कार्यातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत त्यांना या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे.ही नियुक्ती राष्ट्रीय संरक्षक अरुण भारद्वाज, मकसूद अहमद आजमी, राकेश सिंह, कार्यवाहक राष्ट्रीय अध्यक्ष विजय वर्मा व रवी दीक्षित, राष्ट्रीय महासचिव सूर्यकांत कदम, केंद्रीय संयुक्त सचिव जमुना चव्हाण यांच्याशी सविस्तर चर्चा करून राष्ट्रीय अध्यक्ष अजय कुमार मिश्रा यांच्या मान्यतेने करण्यात आली.लक्ष्मण आबा सूर्यवंशी हे उत्कृष्ट चित्रकार, खेळाडू तसेच गेल्या २५ वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. स्पष्टवक्तेपणा, निर्भीड व निष्पक्ष लेखनशैली आणि वास्तववादी मांडणी ही त्यांच्या पत्रकारितेची ओळख आहे. त्यांनी विविध पदांवर कार्य करताना पत्रकारांच्या समस्या, मागण्या शासन-प्रशासन दरबारी मांडून सातत्याने पाठपुरावा केला आहे. सध्या ते शासकीय मान्यताप्राप्त अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या परिवहन समितीचे जळगाव जिल्हाध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत.
त्यांच्या निवडीबद्दल आमदार आप्पा पाटील, माजी आमदार दिलीप वाघ, भाजप नेत्या वैशालीताई सूर्यवंशी, पाचोरा नगर परिषद नगराध्यक्षा सुनीताताई पाटील, उपनगराध्यक्ष किशोर बारवकर, डॉ. अनिल देशमुख, सुनील पाटील, डॉ. योगेश पाटील, संजय पाटील, किशोर रायसाकडा, जिभाऊ पाटील यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, केंद्र व राज्य सरकारकडे पत्रकारांच्या प्रलंबित मागण्या—ज्येष्ठ पत्रकारांसाठी पेन्शन योजना, घरकुल, प्रवास सवलती, मोफत आरोग्य सुविधा व त्यांच्या मुलांसाठी शैक्षणिक सवलती—मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची प्रतिक्रिया लक्ष्मण आबा सूर्यवंशी यांनी व्यक्त केली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 9 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे