बाहेर गावी जाताय दिवाळीला? सावधान! दिवाळी ऐवजी ‘दिवाळं’ निघू नये – पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांचे आवाहन
बाहेर गावी जाताय दिवाळीला? सावधान! दिवाळी ऐवजी ‘दिवाळं’ निघू नये - पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांचे आवाहन
बाहेर गावी जाताय दिवाळीला? सावधान! दिवाळी ऐवजी ‘दिवाळं’ निघू नये – पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांचे आवाहन
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तीर्थक्षेत्र तुळजापूर या पुण्यपावन नगरीत दिवाळी सणाचा उत्साह चहुबाजूंनी दिसून येत आहे. सणासुदीचे दिवस असल्याने अनेक जण आपल्या गावी नातेवाईकांकडे भेटीगाठीसाठी जात आहेत, तर काहींच्या घरी पाहुण्यांची रेलचेल सुरू आहे. मात्र, या संधीचा गैरफायदा चोरटे घेत असल्याने नागरिकांनी विशेष सतर्क राहावे, असे आवाहन तुळजापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांनी केले आहे.
घर बंद असल्याची माहिती मिळताच चोरटे घरांवर डल्ला मारतात. त्यामुळे गावी जाताना घराला कुलूप लावून निर्धास्त जाऊ नका. विशेषत: “गावाकडे जातोय”, “ऑन द वे टू होम” अशा प्रकारचे स्टेटस सोशल मीडियावर टाकण्याची सवय अनेकांकडे आहे. परंतु, याच माध्यमातून चोरट्यांना घर रिकामे असल्याची खात्री पटते, असेही मांजरे यांनी सांगितले.
सोशल मीडियावर प्रवासाची माहिती न टाकता ती केवळ जवळच्या व विश्वासू लोकांनाच द्यावी, असे त्यांनी सुचवले. तसेच, शेजाऱ्यांना आपल्या अनुपस्थितीची कल्पना देऊन घरावर लक्ष ठेवण्याची विनंती करावी. पोर्च किंवा गॅलरीतील दिवे संध्याकाळी चालू ठेवावेत, जेणेकरून घरात हालचाल असल्याचा भास निर्माण होईल, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हा पोलीस अधीक्षक मा. रितू खोखर व उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हे जनजागृती आवाहन करण्यात आले आहे.
पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांनी नागरिकांना विनंती केली आहे की —



