Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

शिवसेना धाराशिव महिला सेनेला नवे नेतृत्व ! मिनाताई सोमाजी यांची जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती;प्रताप सरनाईक यांच्या हस्ते नियुक्तिपत्र प्रदान

मिनाताई सोमाजी यांची जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती;प्रताप सरनाईक यांच्या हस्ते नियुक्तिपत्र प्रदान

0 7 6 4 8 7

शिवसेना धाराशिव महिला सेनेला नवे नेतृत्व !

मिनाताई सोमाजी यांची जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती;प्रताप सरनाईक यांच्या हस्ते नियुक्तिपत्र प्रदान

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेचा आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या शिकवणीचा वारसा पुढे नेत, शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार, शिवसेना (शिंदे गट) धाराशिव जिल्हा महिला सेना जिल्हाप्रमुखपदी मिनाताई रामचंद्र सोमाजी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ही नियुक्ती बुधवार,दिनांक १५ ऑक्टोबर रोजी श्री तुळजाभवानी मंदिर येथे राज्याचे परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते संपन्न झाली.

यावेळी प्रताप सरनाईक म्हणाले, “शिवसेना पक्षाचा विस्तार आणि बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी महिलांची भुमिका अत्यंत महत्त्वाची आहे. मिनाताई सोमाजी या नवे जोश आणि नवे नेतृत्व घेऊन काम करतील, असा विश्वास आम्हाला आहे.”

पक्ष वाढीसाठी सर्वांना सोबत घेऊन कार्य करण्याचे आवाहनही सरनाईक यांनी यावेळी केले.

या कार्यक्रमाला जिल्हाप्रमुख मोहन पणुरे, तालुकाप्रमुख अमोल जाधव, शहर संघटक प्रशांत उर्फ नितीन मस्के, उपशहरप्रमुख रमेश चिवचवे, शहाजी हाके, स्वप्निल सुरवसे, अंकुश रुपनर, गणेश पाटील, संजय लोंढे यांसह सर्व पदाधिकारी, शिवसैनिक व महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तुळजापूरच्या पवित्र भूमीत झालेल्या या नियुक्तीने महिला सेनेत नवचैतन्य निर्माण झाले असून, शिवसेना संघटनेला नवी दिशा मिळेल,असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे