Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

धाराशिव येथे ‘रन फॉर युनिटी’ला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद – एसपी रितू खोखर यांच्या नेतृत्वाखाली एकतेचा धावता संदेश!

0 7 6 4 8 6

धाराशिव येथे ‘रन फॉर युनिटी’ला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद – एसपी रितू खोखर यांच्या नेतृत्वाखाली एकतेचा धावता संदेश!

धाराशिव | ज्ञानेश्वर गवळी

‘राष्ट्रीय एकता दिवस’ आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त धाराशिव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दि. 31 ऑक्टोबर 2025 सकाळी ‘रन फॉर युनिटी’ व ‘वॉक फॉर युनिटी’ या जिल्हास्तरीय उपक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले.

या उपक्रमाचे नेतृत्व मा. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आनंदनगर पोलीस ठाणे येथून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनक घोष, उपअधीक्षक राउत व भोसले यांच्या हस्ते झेंडा दाखवून या दौडीला शुभारंभ करण्यात आला.

धाराशिव शहरातील आनंदनगर – जिजाऊ चौक – बार्शी नाका असा 5 कि.मी.चा मार्ग पूर्ण करत परत आनंदनगर येथे दौडीचा समारोप झाला. या वेळी पोलीस अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी तसेच नागरिकांनी देशभक्तीच्या जयघोषात उत्साहाने सहभाग नोंदवला.

जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमध्येही ‘रन फॉर युनिटी’ व ‘वॉक फॉर युनिटी’चे आयोजन करण्यात आले असून, जनतेत एकतेचा संदेश पोहोचवण्यात आला.

एसपी रितू खोखर यांच्या आदेशानुसार, दि. 28 ते 31 ऑक्टोबर दरम्यान जिल्हा पोलीस दलामार्फत विविध जनजागृती उपक्रम राबविण्यात आले. यावेळी पोलीस संगीत वाद्य पथकाने धाराशिव शहरासह तुळजापूर व कळंब येथे देशभक्तीपर गीतांद्वारे नागरिकांमध्ये राष्ट्रप्रेम आणि सामाजिक ऐक्याचा संदेश दिला.

 

वाद्य पथकातील अंमलदार बालाजी सहाणे, लक्ष्मण चांदणे, श्रीमंत पालके, रामहरी कांबळे आणि विकास कसबे यांनी अप्रतिम सादरीकरण करून नागरिकांची मने जिंकली.

या उपक्रमाद्वारे धाराशिव पोलिस दलाने “एकता हीच शक्ती” हा संदेश जनमानसात पोहोचवला.
एसपी रितू खोखर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा पोलीस दलाने एकात्मतेचा आणि देशभक्तीचा नवा आदर्श घालून दिला, असा प्रतिसाद नागरिकांनी दिला.

5/5 - (1 vote)

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे