ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय
मतमोजणी दिवशी तुळजापूर पेटण्याच्या मार्गावर ? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पोलिसांना इशारा -२१ डिसेंबरला कडक बंदोबस्त नसेल तर अराजक अटळ!

0
7
6
4
8
6
मतमोजणी दिवशी तुळजापूर पेटण्याच्या मार्गावर ? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पोलिसांना इशारा -२१ डिसेंबरला कडक बंदोबस्त नसेल तर अराजक अटळ!
तुळजापूर : प्रतिनिधी
शहरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन गटांत झालेल्या हिंसक वादामुळे वातावरण तणावपूर्ण बनले असून नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) शहराध्यक्ष महेश चोपदार यांनी तुळजापूर पोलीस स्टेशनचे मा. पोलीस निरीक्षक यांना निवेदन देत २१ डिसेंबर २०२५ रोजी मतमोजणी दिवशी कडक पोलीस बंदोबस्ताची तातडीची मागणी केली आहे.

तुळजापूर हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध शक्तीपीठ असून दररोज लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. अशा पवित्र शहरात राजकीय वादातून समाजविघातक घटना घडल्या तर त्याची जबाबदारी कोण घेणार? असा थेट सवाल राष्ट्रवादीकडून उपस्थित करण्यात आला आहे. शांततेत राहणाऱ्या तुळजापूरकरांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असून पोलीस प्रशासनाने निष्काळजीपणा केल्यास परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
निवेदनात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, मतमोजणी दिवशी केवळ उमेदवार व त्यांच्या अधिकृत प्रतिनिधींनाच पास देण्यात यावेत, अनावश्यक गर्दीला शहरात प्रवेश नाकारावा व संपूर्ण शहरात कडक पोलीस बंदोबस्त तात्काळ लागू करावा. अन्यथा समाजकंटकांकडून गैरप्रकार घडण्याची भीती नाकारता येणार नाही, असा इशाराही देण्यात आला आहे.
भाविकांची सुरक्षा, शहरातील शांतता आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी वेळीच कठोर पावले उचलावीत, अशी ठाम मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून करण्यात आली आहे. आता पोलिस प्रशासन काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण तुळजापूरचे लक्ष लागले आहे.
0
7
6
4
8
6



