ब्रेकिंगमहाराष्ट्र
जुगार विरोधी कारवाईत एकाला अटक; १,०९० रुपयांचा मुद्देमाल जप्त
जुगार विरोधी कारवाईत एकाला अटक; १,०९० रुपयांचा मुद्देमाल जप्त

0
6
7
8
4
1
तुळजापूर : शहरात अवैध जुगारावर कारवाईचा सपाटा सुरू असून, तुळजापूर पोलिसांनी मंगळवारी (दि. १७) रात्री सुमारे ८ वाजता जगदंबा कोल्ड्रींग परिसरात छापा टाकून एका तरुणास ताब्यात घेतले. या कारवाईत कल्याण मटका जुगाराचे साहित्य व रोख रक्कम असा एकूण १,०९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बाबुराव दत्ता घोडके (वय २६, रा. वासुदेव गल्ली, तुळजापूर, जि. धाराशिव) हा जगदंबा कोल्ड्रींगसमोर जुगार खेळवित असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस पथकाने तातडीने छापा टाकला. छाप्यात तो जुगाराचे साहित्य व रोख रक्कम स्वतःजवळ बाळगताना आढळून आला.याप्रकरणी संबंधित आरोपीविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२ (अ) अन्वये तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. शहरात अवैध धंद्यांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
0
6
7
8
4
1



