Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

काँग्रेसचा गड भगव्या झेंड्याखाली! माजी पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या गावात ‘शिवसेना’ची शाखा !

धक्का काँग्रेसला! चव्हाणांच्या गावात शिवसेनेचा झेंडा फडकला... 

0 7 6 5 0 5

काँग्रेसचा गड भगव्या झेंड्याखाली! माजी पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या गावात ‘शिवसेना’ची शाखा !

धक्का काँग्रेसला! चव्हाणांच्या गावात शिवसेनेचा झेंडा फडकला…

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

धाराशिव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मधुकरराव चव्हाण यांच्या स्वतःच्या गावात शिवसेना (शिंदे गट) पक्षाची शाखेचे अनावरण करण्यात आले.

या घटनेमुळे काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसल्याचे राजकीय वर्तुळात चांगलेच चर्चेचे वारे वाहू लागले आहेत.अलीकडच्या काळात तुळजापूर तालुक्यात शिवसेनेच्या शाखा उद्घाटनांची लाट उसळली असून, एकापाठोपाठ गावा गावात भगवा झेंडा फडकताना तालुकाध्यक्ष अमोल जाधव दिसत आहे. या मोहीमेच्या माध्यमातून शिवसेना संघटनात्मकदृष्ट्या अधिक मजबूत होत असून, राष्ट्रीय स्तरावरील अन्य पक्षांची चूल हादरल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.

मधुकरराव चव्हाण यांच्या गावात पार पडलेल्या या शाखा उद्घाटन सोहळ्याला शिवसैनिकांचा प्रचंड संख्येने उत्साह लाभला. कार्यक्रमास तालुकाप्रमुख अमोल जाधव, शहरप्रमुख बापूसाहेब भोसले, शेतकरी सेना तालुकाप्रमुख गणेश नेते, शहर संघटक नितीन मस्के, उपशहरप्रमुख रमेश चिवचुवे, महिला आघाडीच्या मीनाताई सोमाजी, शहाजी हाके, स्वप्निल सुरवसे, भुजंग मुकेरकर, गणेश पाटील,विकास जाधव यांच्यासह अणदूर शाखेचे सर्व पदाधिकारी आणि शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.

हा उपक्रम मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आणि पक्षाचे सचिव संजय मोरे, उपनेते ज्ञानराज चौगुले, जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक, सहसंपर्कप्रमुख भगवान देवकते तसेच जिल्हाप्रमुख मोहन पनुरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुकाप्रमुख अमोल जाधव होते. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की —“शिवसेना पक्ष हा लोकांशी थेट जोडलेला पक्ष आहे. तुळजापूर तालुक्यातील प्रत्येक गावात भगवा फडकवण्याचा आमचा संकल्प आहे, आणि हा प्रवास कुणाच्याही भीतीपोटी थांबणार नाही.”

या उद्घाटनामुळे राजकीय समीकरणे ढवळून निघाली आहेत. पारंपरिक काँग्रेस गड असलेल्या गावात आता शिवसेनेचा भगवा झेंडा फडकू लागल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर त्याचा थेट परिणाम होणार,हे मात्र नक्की काँग्रेसचा बालेकिल्ला भगव्या रंगात न्हाऊन निघाल्याने तुळजापूर तालुक्यातील राजकारणात नवा भूचाल निर्माण झाला आहे!

5/5 - (1 vote)

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 5 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे